अकोला : ऑनलाइन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून नागरिकही आलेल्या मॅसेजला आणि कॉलला उत्तर देऊन बळी पडत आहेत. अशीच एक घटना अकोल्यात समोर आली आहे. अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस स्टेशन अंतगर्त रहिवासी असलेल्या पेंशनधारक महिलेला एक मॅसेज आला. तुमचे सीमकार्ड बंद होणार आहे, तुम्ही हे अ‍ॅप डाऊनलोड करा असं केल्यानंतर महिलेच्या खात्यातून लागलीच ५९ हजार रुपये परस्पर काढण्यात आले. रामदासपेठ पोलिसांत या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शैलेजा मंगेश फडणीस (वय ६२ राहणार, भागवत प्लॉट, अकोला.) यांना ३० मार्च रोजी त्यांच्या मोबाइलवर सीमकार्ड ब्लॉक होईल, असा मॅसेज आला. तेव्हा मॅसेजमधील कस्टमर केअर नंबरवर संपर्क केला असता त्यांनी सांगितले की पेटीएम, क्वीक सपोर्ट व बीएसएनएल, एनी डेस्क हे डाऊनलोड करून घेतले. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आपल्या एसीबीआयच्या पेंशन खात्यातून ५९ हजार रुपये काढून फसवणूक केली आहे. यानंतर त्यांनी बँक स्टेटमेंट तपासले असता त्यांच्या खात्यातून रक्कम काढल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी रामदासपेठ पोलिसांत तक्रार दिली. यावरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस करीत आहेत.

load shedding in maharashtra: राज्यातील लोडशेडिंगबाबत उर्जामंत्री नितीन राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; येत्या मंगळवारपर्यंत…
अनोळखी मोबाइल नंबरला रिप्लाय देऊ नका

बँकेतून बोलतो, तुमचे आधार, पॅनकार्ड लिंक नाही ‘ते’ करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला आलेला ओटीपी सांगा, एटीएम कार्डवरील नंबर आणि पिन नंबर सांगा, तुमच्या मोबाइल नंबरला लॉटरी लागली आहे, असे प्रकारचे अनेक कॉल आणि मॅसेज मोबाइलवर येत राहतात. ‘त्या’ कॉलला उत्तर देऊ नका, कोणतीही बँक मोबाइलवरून असे कॉल करत नाही, असे आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने फसवणुकीच्या घटना घडत राहतात. यापुढे अनोळखी नंबरला रिप्लाय देऊ नका, असे आवाहन अकोला पोलिसांनी केले आहे.

भाजप आमदार गणेश नाईकांवर गुन्हा दाखल; जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here