औरंगाबाद : पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या मित्राचा खून करून त्याच्या शरीराचे १७ तुकडे करून घराशेजारील बोअरवेलमध्ये टाकणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेप आणि विविध कलमांखाली २५०० रुपये दंड ठोठावला. साहिल ऊर्फ गुड्डू अफसर शेख (रा. खादगाव, ता. पैठण) असे आरोपीचे नाव असून,मुजीम शेख नबी शेख (रा. खादगाव, ता. पैठण) असे मृत व्यक्तीचे नाव होते. सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी शनिवारी ही शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे आरोपी साहिलच्या पत्नीची साक्ष महत्त्वाची ठरली. तिने मुजीमशी तिचे अनैतिक संबंध असल्याचे कबूल केले. तसेच घटनेच्या दिवशी मुजीम व साहिल सोबत असल्याचेही तिने सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी की, १० ऑक्टोबर २०१७ रोजी मुजीम तंबाखूची पुडी घेण्यासाठी गेला, तो परतला नाही. तर त्याच्या घरच्यांनी त्याचा शोध घेऊन तो मिळाला नाही. त्यामुळे मुजीमचे वडील शेख नबी शेख शब्बीर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाचोड पोलीस ठाण्यात मसिंगची तक्रार नोंदविण्यात आली होती. दरम्यान पोलिसांनी आरोपी साहिलला संशयित म्हणून ताब्यात घेतले होते, पण पुरावे नसल्याने न्यायालयाने जामीन दिला. दरम्यान, दोन महिन्यांनी साहिलच्या घराजवळील बोअरवेल परिसरात दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

सावधान! मोबाईलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करताच खात्यातून ५९ हजार लंपास, घटना वाचून हादराल
यामुळे पोलिसांनी महसूल विभागाशी संपर्क साधून जेसीबीच्या साहाय्याने बोअरवेल खोदत असताना २० ते २५ फुटांखाली बोअरवेलच्या पाईपमध्ये शरीराचे सडलेल्या अवस्थेतील १७ तुकडे मिळाले. तसेच एक मोबाईल आणि शर्ट सापडला. मोबाईल व शर्ट हे मुजीमचे असल्याचे नबी यांनी ओळखले. त्यावरून साहिलसह त्याच्या दोन भावांवर पाचोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. अखेर यावर अंतिम निकाल देताना न्यायालयाने साहिल याला जन्मठेप आणि विविध कलमांखाली २५०० रुपये दंड ठोठावला आहे.

load shedding in maharashtra: राज्यातील लोडशेडिंगबाबत उर्जामंत्री नितीन राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; येत्या मंगळवारपर्यंत…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here