मुंबई: मुख्यमंत्री हे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर निवडून जाणार असल्याचं निश्चित झाल्यानंतर माजी खासदार यांनी त्यांच्यावर कडवट शब्दांत टीका केली आहे. ‘मुख्यमंत्रिपद काँग्रेस-राष्ट्रवादीमुळं, आमदारकी राज्यपालांकडून आणि पक्ष वडिलांचा… ह्या माणसाचं स्वत:चं असं काहीच नाही,’ असा टोला राणे यांनी उद्धव यांना हाणला आहे.

राणे कुटुंबीय आणि शिवसेनेचं राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळं राणे पिता-पुत्र शिवसेनेवर विशेषत: उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. करोनाचं संकट आल्यापासून खासदार नारायण राणे यांचे दोन्ही सुपुत्र सातत्यानं उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. गेल्या काही दिवसातील ही टीका ‘करोना’च्या अनुषंगानं होती. मात्र, नीलेश राणे यांनी आज केलेलं ट्विट खूपच खोचक आहे. ‘उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रासाठी पनवती असून स्वत:साठी मात्र नशीबवान आहेत. त्यांना सगळं बसल्या-बसल्या मिळालंय. आता आमदारकीही बसल्या जागी राज्यपालांनी दिली, असं राणेंनी ट्विटमध्ये म्हटलंय. ‘या आमदारकीचा वापर महाराष्ट्रासाठी करा, असाही सल्लाही त्यांनी दिलाय.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांची राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती करण्याबाबतचा निर्णय झाला. विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेले, पण मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या उद्धव ठाकरे यांना सहा महिन्यात सभागृहाचा सदस्य होणे आवश्यक होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेची निवडणूक लांबणीवर पडल्यानं त्यांच्या निवडीचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर त्यावर आज तोडगा काढण्यात आला. त्यामुळं पुढील घटनात्मक पेच टळला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here