दिल्लीः हनुमान जयंतीनिमित्त काढलेल्या शोभायात्रेवेळी दोन समुदायांत हिंसाचार उसळल्याची घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. दिल्लीतील जहांगीरपुरी भागात ही घटना घडली असून दगडफेकीत अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेवरुन देशात राजकारण पेटलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दंगलीचा निषेध केला. (Delhi Violence)

दिल्लीतील परिस्थितीबद्दल बोलताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्व जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी सुरक्षेची जबाबदारी केंद्रावर टाकत दिल्लीची सुरक्षा केंद्राच्या हातात असल्याचं म्हटलंय. ‘दिल्लीतील यंत्रणा, पोलीस यांची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. त्यामुळं केंद्र सरकारने दिल्लीत शांतता आणि सुव्यवस्था राखली पाहिजे,’ असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

Delhi Violence: आता हनुमान जयंती शोभायात्रेत हिंसाचार; दिल्लीत घडली धक्कादायक घटना
याआधीही अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केलं आहे. दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये मिरवणुकीत झालेल्या दगडफेकीची घटना अत्यंत निंदनीय आहे. या प्रकरणी दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी. सर्व जनतेला शांतता राखण्याचे अवाहन केजरीवाल यांनी केलं आहे.

वाचाः राज्यातील लोडशेडिंगबाबत उर्जामंत्री नितीन राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; येत्या मंगळवारपर्यंत…

दरम्यान, देशात गेल्या काही दिवसांपासून जातीय हिंसाचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. रामनवमी दिवशी देशातील अनेक राज्यांत हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. शोभायात्रांदरम्यान दगडफेक व जाळपोळीच्या घटनांमुळे तणाव निर्माण झाला होता. त्यावर तीव्र चिंता व्यक्त होत असून आजच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह विरोधी पक्षाच्या १३ प्रमुख नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी करत या घटनांचा निषेध केला आहे. शांतता आणि सलोखा राखा, असे आवाहन लोकांना करतानाच जातीय हिंसाचार भडकवणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी या नेत्यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या घटनांवर मौन बाळगून असल्याबद्दलही या नेत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

वाचाः भाजप आमदार गणेश नाईकांवर गुन्हा दाखल; जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here