अमरावती : उन्हाचा पारा वाढत असताना आज शनिवारी दुपारी अचानक राष्ट्रीय महामार्गावरील वडाळी खदान जवळ बिंल्डिगच्या वापरात असलेल्या केमिकल घेऊन जाणाऱ्या मोठया टँकरने अचानक पेठ घेतला. टँकरने पेट घेतल्याची माहिती होताच चालकाने ट्रक थांबून गाडीतून उडी घेतली. चालकाने सुरुवातीला ट्रक मध्ये असलेल्या साहित्याने आग विझविण्याचा प्रयत्न ही केला मात्र, आग वाढतच असल्याने आगीवर नियंत्रण आणणे आटोक्याच्या बाहेर गेले.
आग अनेक तास सुरूच असल्याने टँकर जागीच जळून खाक झाला आहे. याची माहिती महादेवखोरी वडाळी वडारपुरा या ठिकाणी होताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन विभागाला सुद्धा माहिती देण्यात आली. टँकर अचानक पेटल्याने रस्त्यावरील वाहतूक अनेक तास खोळंबली याचीच माहिती फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक अनिल कुरळकर यांना होताच त्यांनी तात्काळ पोलीस पथक घटनास्थळी पाठविण्यात आले तर अग्निशमन विभागाला सुद्धा तात्काळ माहिती देण्यात आली.
टँकर मध्ये बिल्डिंग बांधकामात वापरण्यात येत असलेली केमिकल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, टँकर मध्ये केमिकल नसल्याचे तो रिकामा जात असल्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे.