shiv sena ed raid: कोकणात राजकीय वातावरण तापलं, दोन वजनदार नेते ईडीच्या रडारवर? – two big leaders from konkan on ed radar inquiry soon ratnagiri news today
रत्नागिरी : कोकणात प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाबद्दल असलेले समर्थक आणि विरोधक अशा दोन मतप्रवाहांमुळे वातावरण तापले आहे. त्यातच या परिसरातील व्यवहारावर ईडीचे लक्ष आहे. जिल्ह्यात वाढत्या राष्ट्रवादीच्या हस्तक्षेपामुळे शिवसेनेचे जुने जाणते पण वजनदार नेते अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. यामुळे आगामी काळात योग्य ती तडजोड न झाल्यास राजकीय भूकंप होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मुंबई-ठाणे येथील कारवाईनंतर कोकणात, रत्नागिरी जिल्ह्यातील दोन वजनदार नेते ईडीच्या रडावर असल्याची खुसखुशीत चर्चा रंगली आहे. यामध्ये कितपट तथ्य आहे किंवा कसे ? या सगळ्या विषयी ईडीकडे जिल्ह्यातील विरोधी पक्षातील एक बड्या ज्येष्ठ नेत्याने थेट ईडीकडे तक्रार केल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. दरम्यान, रत्नागिरीतील शिवसेनेच्या एका बड्या नेत्याचे नावही ईडीच्या रडावर असल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे आगामी काळात राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. पुण्यात पत्रकार परिषद घेत राज ठाकरेंनी केल्या २ मोठ्या घोषणा शिवसेनेचा आक्रमक आमदार ईडीच्या रडारवर?
विधिमंडळातल्या आक्रमक भूमिकेला ईडीद्वारे प्रत्युत्तर? असे अंदाज लावणाऱ्या चर्चा सुरू झाल्या असल्या तरी यात कितपत तथ्य आहे ? याबाबत तपशीलवार माहिती मिळालेली नाही पण या नेत्याची हॉटेल्स, शो रूम, रिसॉर्टच्या व्यवहारांची चौकशी होण्याची शक्यता आहे. तपासणी होणार असल्याची चर्चा आहे. याबाबत काहींना शंका असून याची चौकशी झाल्यास अनेक आर्थिक व्यवहार समोर येऊ शकतात यामुळे अनेकांच या विषयाकडे लक्ष लागून राहीले आहे.
याचा फायदा कोकणात राजकिय दृष्टया कोणाला कसा होईल याचा अंदाज आत्ताच लावणे कठीण असले तरी येत्या काळात राजकिय घडामोडी, प्रकल्पाबाबततची भूमिका व ईडीच्या चौकशी लावण्याची चर्चा याकडे अवघ्या कोकणाचेच नाही तर राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.