बीड: बीड जिल्हा परिषदच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे लेखाधिकारी अ.व.बुरांडे यांचा टेबलवर बसून पैसे घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अधिकारी बुरांडे हे टेबल वरील फाईल सारतात आणि एक व्यक्ती टेबल वर पैसे ठेवतो. फाईलवर पैसे ठेवल्याशिवाय फाईल पुढे सरकत नाही, अशीच काही परिस्थिती बीडमध्ये पाहायला मिळत आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यामध्ये विकास कामाच्या फाईल पुढे सरकण्यासाठी अधिकारी टेबलवर पैशाची मागणी करतात आणि लाच स्वीकारताना देखील दिसून येत आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये फाईलवर वजन ठेवल्याशिवाय कुठली फाईल पुढे सरकत नसल्याचे बोलले जात आहे. एकंदरीतचं भ्रष्टाचाराचे कुरण झालेल्या या सर्व कार्यालयामध्ये अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी होत आहे.