मुंबई: कपूर खानदानातील लग्नाच्या सोहळ्याची नेहमीच चर्चा होते. आणि त्यात हे लग्न कपूरांचा वारसदार रणबीर कपूर आणि सध्याची आघाडीची नायिका आलिया भट्ट यांचं बहुचर्चित लग्न असेल तर मग काय विचारूच नका. पाच वर्षांच्या रिलेशनशीपनंतर १४ एप्रिलला या दोघांनी लग्न केलं. अत्यंत घरगुती समारंभात झालेल्या या लग्नाचे फोटो सोशलमीडियावर पोस्ट झाले. लग्न होऊन पाहुणे परतले तरी अजून या लग्नाचं वर्णन सुरूच आहे. खरंतर ही जोडी सध्या एकमेकांची कंपनी एन्जॉय करत घरीच थांबली असताना हुनरबाज या रिअॅलिटी शोच्या मंचावर होस्ट भारती सिंग हिने रणबीरची आई नीतू कपूर यांची मुलगा आणि सुनेशी भेट घालून त्यांना धक्काच दिला. अर्थात या भेटीचा टवीस्ट कळाल्यावर नीतू यांनाही हसू आवरलं नाही. सध्या हा प्रोमो खूपच व्हायरल होत आहे.

फक्त पैशांसाठी १२ दिवसांच्या बाळाला शूटिंगवर आलीए…ट्रोल करणाऱ्यांना भारतीचं सडेतोड उत्तर

रणबीर आणि आलियाच्या लग्नाची धामधूम संपताच कपूर आणि भट्ट कुटुंबातील प्रत्येकजण त्यांच्या कामात लागला आहे. फक्त रणबीर आणि आलिया ही जोडी सध्या त्यांच्या वास्तू या घरात एकमेकांच्या सहवासात रमली आहे. रणबीर आलियाच्या लग्नाची नाही तर निदान रिसेप्शनचं तरी बोलावणं येईल याकडे लक्ष लावून बसलेल्यांना नीतू या कोणतंही रिसेप्शन होणार नसल्याचं सांगत त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी बाहेर पडल्या. नुकतीच नीतू यांनी त्यांच्या डान्स दिवाने ज्युनिअर या शोच्या प्रमोशनसाठी हुनरबाज या शोमध्य हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासोबत दिग्दर्शक आणि कपूरांचा फॅमिली फ्रेंड करण जोहर हादेखील उपस्थित होता. या शोमध्ये नीतू सिंग यांनी भरपूर धमाल केली.

हुनरबाज या शोची होस्ट कॉमेडीक्वीन भारती सिंग हिने नीतू यांचे स्वागत तर केलेच पण बोलता बोलता आता आपण भेटूया बॉलिवूड कपल रणबीर आणि आलिया यांना असे म्हणत त्यांचेही स्वागत केले. आता मुलगा आणि सून घरी असताना अचानक या मंचावर कसे आले असा प्रश्न नीतू यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तेवढ्यात रणबीर आणि आलिया यांचे कपललूकमधील कटआउट पोस्टर मंचावर अवतरले. त्यावेळी भारती म्हणाली, या स्पेशल लग्नात आम्ही आलो नसलो तरी त्यांच्या लग्नाचा माहोल आपण या मंचावर नक्कीच आणू शकतो. लग्नात जी धमाल आम्ही करू शकलो नाही ती आता करणार आहोत असं म्हणत बद्री की दुल्हनिया या गाण्यावर सर्वांनी ठेका धरला.

हुनरबाजमध्ये होस्ट भारती आणि हर्ष यांनी आणलेल्या धमाल सेगमेंटची नीतू कपूर आणि करण जोहर यांनीही मजा लुटली. पण रणबीर आणि आलियाच्या लग्नात ऋषी कपूर यांच्या आठवणीने भावूक झालेल्या नीतू यांना ऋषी यांचा किस्सा सांगण्याचा मोह आवरला नाही. मुलगा रणबीरचे लग्न व्हावे ही ऋषी यांची शेवटची इच्छा होती. आणि म्हणूनच रणबीरच्या लग्नात मी ऋषी यांची ती इच्छा पूर्ण होताना पाहत होते. ते जरी लग्नात नसले तरी ते आमच्या मनात होते असं म्हणताना नीतू यांचे डोळे पाणावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here