जळगाव : शहरातील फातेमानगरात रविवारी सायंकाळी सहाय्यक अधिक्षकांच्या पथकाने एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने छापा टाकून आयपीएलवर सट्टा करणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. पथकाने केलेल्या कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल ९५ हजार ६०० रुपये रोख आणि ५ मोबाईल व टीव्ही असा ९५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात जळगाव पोलिसांनी केलेली ही पहिलीच कारवाई आहे.

असा टाकला छापा…

जळगावातील फातेमा नगरात आयपीएल मॅचेसवर सट्टा घेतला जात असल्याची माहिती सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाला मिळाली होती. रविवारी सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, मीनल साकळीकर, महेश महाले , रवींद्र मोतीराया यांच्या पथकासह एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील अतुल वंजारी, इम्रान सैय्यद, सचिन पाटील, योगेश बारी यांनी फातेमा नगरात आयेशा किराणाजवळ छापा टाकला.

झेंडा काढण्याच्या कारणावरून अचलपूरमध्ये दोन गटात राडा, जमावबंदी लागू
९५ हजार ६०० रुपयांचा मुदेमाल जप्त…

पथकाने केलेल्या कारवाईत इम्रान अमीन खान वय-४० रा.चिखली ह.मु.फातेमा नगर, वसीम सैय्यद कामरोद्दीन वय-३८, जावेद नबी शेख वय-३० रा.फातेमा नगर यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ४० हजार ६०० रुपये रोख आणि ५ मोबाईल हस्तगत व टिव्ही असा एकूण ९५ हजार ६०० रुपयांचा मु्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक इम्रान सैय्यद करीत आहे.

भारनियमनाबरोबर वीज बिलांचा धक्का; ‘या’ महिन्यामध्ये वाढीव वीजबिल येणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here