नवी दिल्ली :कोरोना (Corona) रुग्णसंख्या जानेवारी २०२२ पासून कमी होत असल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळालं होतं. सलग ११ आठवडे कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना नुकत्याच संपलेल्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या ३५ टक्क्यांनी वाढली आहे. जानेवारीनंतर १२ व्या आठवड्यानंतर कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. नवी दिल्ली (New Delhi), उत्तर प्रदेश (UP) आणि हरियाणा राज्यात कोरोना रुग्ण वेगानं वाढले आहेत. कोरोना रुग्णसंख्येच्या टक्केवारीत वाढ झाली असली तरी अद्याप चिंता करण्याची गरज नसल्याचं दिसून येत आहे. कोरोना रुग्णवाढ या तीन राज्यांमध्येच दिसून येत आहे. ११ ते १७ एप्रिल या आठवड्यात ६६१० कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर त्यापूर्वीच्या आठवड्यात ४९०० रुग्ण आढळले होते. दुसरीकडे केरळ राज्यानं कोरोना संसर्गाची आकडेवारी देणं बंद केलं असल्याचं समोर आलं आहे.
खबरदार! आता नाशिक पोलीस आयुक्तांनी दिला भोंग्यांवर अल्टिमेटम, ३ मेपर्यंत…
दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णसंख्या दुप्पट
भारतातील नवी दिल्ली हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यात गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढली आहे. दिल्लीत ११ ते १७ एप्रिल या आठवड्यात २३०७ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर, त्यापूर्वीच्या आठवड्यात ९४३ रुग्ण आढळले होते. हरियाणात गेल्या आठवड्यात १११९ कोरोना रुग्ण आढळले त्यापूर्वीच्या आठ दिवसात ५१४ कोरोना रुग्ण आढळून आले होते. उत्तर प्रदेशात गेल्या आठवड्यात ५४० कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापूर्वी तिथं २२४ कोरोना रुग्ण आढळले होते.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा भीषण अपघात: एक जण ठार; दोघे गंभीर जखमी
जानेवारीतील लाटेनंतर रुग्णसंख्येत घट
दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांशिवाय दुसऱ्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या घटली आहे. कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या घटलेय, गुजरातमध्ये गेल्या आठवड्यात ११ एप्रिल ते १७ एप्रिल दरम्यान ११५ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तिथं त्यापूर्वीच्या आठवड्यात ११० रुग्ण आढळले होते. राजस्थान नुकत्याच संपलेल्या आठवड्यात ९० रुग्ण आढळले आहेत. भारतातील इतर राज्यांमध्ये १७ ते २३ जानेवारीच्या आठवड्यानंतर कोरोना रुग्णसंख्या घटली होती.

नवी दिल्लीत रविवारी ५१७ कोरोना रुग्णांची नोंद
दिल्लीतील कोरोना रुग्णसंख्या कमी होत नसल्याचं चित्र आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. रविवारी दिल्लीत ५१७ कोरोना रुग्णांची नोंद झाली. रुग्णवाढीचा दर ४.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे. दुसरीकडे २६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या तीन दिवसात दिल्लीत रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. १४ एप्रिलला १६ रुग्ण दवाखान्यात दाखल झाले होते. तर १७ एप्रिलला ३७ जणांना उपचारासाठी रुग्णालयात आणलं गेलं आहे. दिल्लीतील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता १५१८ वर पोहोचली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here