मुंबई: छोट्या पडद्यावरील ‘देवमाणूस‘ या मालिकेनं अल्पावधीतच लोकप्रियतेचं शिखर गाठत प्रेक्षकांची मनं जिंकली. ही मालिका विविध रहस्यमयी घडामोडींमधून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरली असून त्यातील सर्वच पात्रे चांगलीच पसंतीस उतरली. पहिल्या पर्वाप्रमाणेच मालिकेच्या दुसऱ्या पर्वालादेखील प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय.

पहिल्या पर्वात अजितकुमारला लग्नाच्या मांडवातून दिव्या सिंगनं खेचून पोलिस स्टेशनला नेल्यामुळं डिंपल आणि अजितचं लग्न काही होऊ शकलं नव्हतं. पण आता या पर्वातही या दोघांच्या लग्नाचा घाट घालण्यात आला होता. दोघांचं लग्न होणार की नाही,याबद्दल चर्चा सुरू होती.अखेर दोघांचं लग्न पार पडलं आहे. पण गेल्या काही दिवसांपासून व्हायरल झालेल्या एका प्रोमोमध्ये डॉक्टर डिंपलला लग्नाचं गिफ्ट देणार असल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्यामुळं हे गिफ्ट नक्की काय असणार याबद्दल उत्सुकता होती.

प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे डॉक्टरनं डिंपलला असं काय दिलं असेल की ज्यामुळं डिंपल इतकी घाबरते, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. या प्रश्नाचं उत्तर मिळालं असून डॉक्टरनं डिंपललाही त्याच्या जाळ्यात ओढलं आहे. डॉक्टरने सोनाली अर्थात सोनूचा खून केला आहे. आणि तिचं प्रेत त्यानं डिंपलला गिफ्ट म्हणून दाखवलं आहे.

सोनूच्या कुटुंबियांची जमीन डॉक्टरनं डिंपलच्या नावावर केली आहे. त्यामुळं या प्रकरणात डिंपल कशी अडकते, किंवा मालिकेत आणखी काय मोठा ट्विस्ट येतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

भानगड काय आहे नक्की ? बज्याचा नवीन लुक पाहून प्रेक्षक गोंधळले

देवमाणूस २‘ या मालिकेनं नुकताच १०० भागांचा टप्पा गाठला आहे. मालिकेच्या सेटवर केक कापत हा आनंद संपूर्ण टीमनं साजरा केला. या यशामागं संपूर्ण टीमची मेहनत असल्यामुळं या आनंदाच्या क्षणी एकमेकांचं कौतुक करण्यासह आभारदेखील मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here