कीव: रशिया (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) यांच्यातील युद्ध सुरु होऊन आता ५० दिवस होऊन गेले आहेत. रशियाने यूक्रेनमधील विविध शहरांवर हल्ले केले आहेत, मात्र काही शहरांमधून रशियाला माघार घ्यावी लागली आहे. रशियन युद्धनौका काळा समुद्रामध्ये बुडाल्यानंतर रशिया आक्रमक झाला आहे. रशियानं यू्क्रेनचं महत्त्वाचं बेट असलेल्या मारियुपोलवर (Mariupol) तीव्र हल्ले सुरु केले आहेत. या ठिकाणी एका स्टील फॅक्टरीत यूक्रेनचे सैन्य असून त्यांच्याकडून रशियन सैन्याचा प्रतिकार करण्यात येत आहे. रशियन सैन्याकडून देण्यात आलेला शरणागतीचा प्रस्ताव यूक्रेनच्या सैनिकांना फेटाळला आहे. यूक्रेनच्या सैनिकांनी शरण यावं अन्यथा मृत्यूला सामोरं जाण्याचा इशारा दिला होता. मात्र, यूक्रेनच्या सैनिकांनी त्याला नकार देत संघर्ष करण्याची भूमिका घेतली आहे.
फ्रान्समध्येही हिजाबबंदीचा मुद्दा तापला, राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची मागणी
रशियानं मारियुपोलमधील अनेक ठिकाणांवर ताबा मिळवला असल्याची माहिती आहे. यूक्रेनमधील मारियुपोल हे महत्त्वाचं शहर आता रशियाच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. रशियन सैन्यानं मारियुपोलमध्ये प्रवेश करण्याचे आणि बाहेर जाण्याचे रस्ते बंद करण्यात आल्याची माहिती दिली आहे. रशियन सैन्याकडून मारियुपोलमधील नागरिकांना पास देण्यात येत आहेत. शहरात दुसऱ्या ठिकाणी जायचं असल्यास त्यांना पास दाखवावे लागणार आहेत.

रशियानं २४ फेब्रुवारीला यूक्रेन विरोधात आक्रमण करत युद्धाला सुरुवात केली होती. तेव्हापासून मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई केल्यानंतर रशियाला मारियुपोलवर नियंत्रण मिळवता आलेलं आहे. मारियुपोल शहरावर संपूर्णपणे रशियाने ताबा मिळवल्यास तो त्यांच्यासाठी सर्वात मोठा विजय ठरणार आहे.

रशियानं २०१४ मध्ये क्रीमियावर ताबा मिळवला होता. आता यूक्रेनला मारियुपोलच्या रुपात आणखी एक महत्त्वाचे बेट गमवावं लागणार असल्याचं दिसत आहे. मारियुपोल हे महत्त्वाचं औद्योगिक क्षेत्र देखील होतं. रशियन सैन्यानं यापूर्वीचं मारियुपोल शहरातून यूक्रेनचे सैन्य पूर्णपणे हटवण्यात आल्याची माहिती दिली होती.
लष्करप्रमुखांनी इम्रान खान यांच्या कानशिलात लगावली?; पाकिस्तानात मोठं नाट्यरशियानं मारियुपोल शहराला सात आठवड्यांपासून वेढा घातल्यानंतरही यूक्रेनचे सैन्य लढा देत आहेत. यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी मारियुपोलमध्ये यूक्रेनच्या सैनिकांना मारण्यात आल्यास चर्चेचा मार्ग बंद होईल, असा इशारा दिला आहे. यूक्रेनचे सैनिक अजोवस्तल स्टील वर्क कंपनीमध्ये थांबले आहेत. हा त्या कंपनीचा यूरोपमधील सर्वात मोठा प्लांट म्हणून ओळखला जातो. कंपनीमध्ये २५०० यूक्रेनचे सैनिक, ४०० परदेशी सैनिक लपले असल्याचा अंदाज रशियाकडून व्यक्त करण्यात आला आहे. कंपनीचा परिसर ११ किलोमीटरचा आहे. कंपनीत काही यूक्रेनचे नागरिक देखील लपले असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here