नवी दिल्ली : पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहिल्यानंतर आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानातूनच शाहबाज शरीफ यांना टीकेला सामोरं जावं लागत आहे. दोन्ही देशांनी शांततेच्या माध्यमातून जम्मू काश्मीर आणि इतर वादग्रस्त मुद्दे सोडवले पाहिजेत, असं शरीफ यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं. या पत्रानंतर शाहबाज शरीफ यांच्यावर टीका करण्यात येत आहे. भारतात पाकिस्तानच्या दुतावासाचे उपायुक्त म्हणून काम केलेल्या अब्दुल बासित यांनी शरीफ यांची कमजोर प्रतिक्रिया म्हटलं आहे. भारताला अजून सडेतोड उत्तर देता आलं असतं, असा दावा त्यांनी केलाय.

शाहबाज शरीफ यांनी रविवारी नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल पत्र लिहिलं होतं. नरेंद्र मोदींनी शाहबाज शरीफ यांना पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या.

अब्दुल बासित यांनी शाहबाज शरीफ यांचं ट्विट करत ही एक कमोजर प्रतिक्रिया असल्याचं म्हटलं आहे. काश्मीर हा मुद्दा नसून वाद आहे. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, भारत समर्थित काश्मीरमधील हिंसाचाराचं काय असा सवाल अब्दुल बासित यांनी केला. कमांडर कुलभूषण जाधवचे काय? पाकिस्तानला असल्या क्षमा याचनेची गरज नाही, असं अब्दुल बासित यांनी स्पष्ट केलं.

पहिल्या चर्चेतच युद्धाची घोषणा करायला हवी होती का?
अब्दुल बसत यांच्या ट्विटला एका यूजरनं उत्तर दिलं आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतासोबतच्या पहिल्या चर्चेतच युद्धाला सुरुवात करायला हवी होती का?, असा प्रश्न अब्दुल बासित यांना केला आहे. याच्या उत्तरात अब्दुल बासित यांनी भारताला अजून चांगल्या प्रकारे उत्तर देता आले असते, असं म्हटले आहे.
पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांचं नरेंद्र मोदींना पत्र, काश्मीरच्या मुद्यावर शाहबाज शरीफ म्हणाले…
सजाद सईद नावाच्या एका ट्विटर अकाऊंटवरुन शाहबाज शरीफ यांच्यावर टीका करण्यात आी आहे. पाकिस्तानचं पहिलं औपचारिक समर्थन, ही एक कमजोर प्रतिक्रिया असून काश्मीरचा मुद्दा यामुळं कमजोर होतो. तर, ५ ऑगस्ट २०१९ ला भारतानं काश्मीरमधील ३७० कलम हटवलं होतं. त्या विरोधात पाकिस्ताननं जे प्रयत्न केले होते त्या प्रयत्नांवर पाणी फेरण्याचं काम यामुळं झालं आहे. शरीफ कुटुंबाकडून अशा प्रकारची प्रतिक्रिया येणं हे आश्चर्यजनक नाही, असं देखील तो म्हणाला आहे.

सध्याचे पंतप्रधान पाकिस्तानचं प्रतिनिधीत्त्व करत नसून ते स्वत: वरील भ्रष्टाचाराचे आरोप मिटवण्याचं काम करत आहेत. दुसरीकडे अमेरिकेच्या अजेंड्याप्रमाणं ते काम करत असल्याचा आरोप इनायत शाह यांनी केला आहे.
श्रीलंकेत पाकिस्तानची पुनरावृत्ती, राजपक्षे सरकार संकटात; विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here