सांगली : अपघात नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कर्नाटक परिवहन मंडळाला सांगली न्यायालयाने चांगलाचं दणका दिला आहे. मयत कुटुंबाच्या वारसांना भरपाई देण्यासाठी थेट बस जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. ८ लाख ३३ हजारांची भरपाई करण्याचे आदेश देऊन देखील भरपाई देण्यात येत नसल्याने न्यायालयाने ही कारवाई केली आहे.

काय आहे संपूर्ण घटना?..

मिरज शहरामध्ये 2015 साली एक अपघात घडला होता. या अपघातामध्ये कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसची धडक बसल्याने दुचाकीवरील भानुदास भोसले यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मृतच्या नातेवाईकांना सांगली न्यायालयात नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला होता. ज्यामध्ये 2016 सालामध्ये सांगली न्यायालयाने कर्नाटक परिवहन मंडळाला मृत भोसले यांच्या कुटुंबियांना 8 लाख 33 हजार 563 रुपये देण्याचे आदेश दिले होते. मात्र, सदरची नुकसान भरपाई रक्कम देण्यास कर्नाटक एसटी महामंडळाकडून टाळाटाळ करण्यात येत होती.

दिल्लीचे सगळे खेळाडू क्वारंटाइन; IPL 2022 स्थगित झाल्यास दोन संघांना होणार सर्वात मोठा फायदा
याबाबत मृत भोसले यांच्या पत्नी विजया भोसले यांनी सांगली न्यायालयामध्ये सदरची बाब निदर्शनास आणून दिली असता,सांगली न्यायालयाने थेट एसटी महामंडळाची बस जप्त करून नुकसान भरपाई वसुल करण्याचे आदेश सुनावले. त्यानंतर सांगली न्यायालयाच्या बेलीफकडून सांगली एसटी डेपोतुन कर्नाटकची एसटी बस जप्त करत मृत भोसले यांच्या पत्नी विजया भोसले यांच्या ताब्यात देण्यात आली आहे.

आरटीपीसीआर लॅबसाठी कोट्यवधींचा गैरव्यवहार? मालेगावमधील धक्कादायक प्रकार उघड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here