नवी दिल्ली : रशिया (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) यांच्यातील युद्धाला ५० दिवसांपेक्षा अधिक दिवस झालेल आहेत. रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धात अणूबॉम्ब किंवा रासायनिक शस्त्रांचा वापर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे जगावर आणखी एका युद्धाचं सावट निर्माण झालं आहे. तुर्कीनं इराकमध्ये लष्करी कारवाई सुरु केली आहे. तुर्कीनं उत्तर इराकच्या कुर्दिस्तानमध्ये हल्ले सुरु केले आहेत. तुर्कीचे संरक्षण मंत्री हुलुसी अकर याला दुजोरा दिला आहे.

हुलुसी अकर यांनी आमची लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर्स आणि ड्रोन्स कुर्दिश सैन्यावर हल्ला करत असल्याचं म्हटलं आहे. कुर्दिश तळांवर तुर्कीच्या सैन्यानं हल्ले केल्याची माहिती अकर यांनी दिली आहे. तुर्कीकडून कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीशी संबंधित ठिकाणांवर हल्ले करण्यात आले असल्याची माहिती अकर यांनी दिली. तुर्की सैन्याचे कमांडो इराकमध्ये दाखल झाले आहेत,अशी माहिती देखील त्यांनी दिली.

तु्र्कीचे संरक्षण मंत्री हुलुसी अकर यांनी तुर्कीच्या सैन्यानं पीकेके संबंधित ठिकाणांवर यशस्वी हल्ले केल्याची माहिती दिली. कुर्दिश हे उत्तर इराकमध्ये असून तुर्कीवर हल्ला करण्यासाठी त्या भागाचा वापर करण्यात येत असल्याचं ते म्हणाले. तुर्कीनं गेल्या काही दशकांपासून कुर्दिश बंडखोरांवर सशस्त्र हल्ले केले आहेत. तुर्कीनं या ठिकाणी हवाई हल्ले केले आहेत. उत्तर इराकमधील मेटिना, जैप आणि अवशिन बस्यान क्षेत्रांमध्ये हल्ले करण्यात आले आहेत.
शेवटच्या श्वासापर्यंत लढणार, रशियाच्या धमकीनंतरही मारियुपोलमध्ये यूक्रेनचे सैन्य ठाम

तुर्कीनं कुर्दिश बंडखोरांशी संबंधित ठिकाणी कारवाई केली आहे. पीकेकेला अमेरिका आणि यूरोपियन संघानं दहशतवादी संघटना घोषित केलं आहे. इराक, सीरिया,इराण आणि अर्मेनियात कुर्दिश लोक वास्तव्यास आहेत. कुर्दिश लोकांची लोकसंख्या साडे तीन कोटींच्या दरम्यान आहे. त्यामुळं कुर्द स्वतंत्र देशाची मागणी करत आहे.

दुसरीकडे तुर्कीच्या इस्तंबुलमध्ये आज मोठा स्फोट झाला. यामध्ये १० लोक जखमी झाले आहेत. हा स्फोट इस्तंबुलच्या बेयोग्लूमध्ये झाला. या ठिकाणी मदतकार्य सुरु आहे. हा स्फोट रहिवासी इमारतीच्या भूमिगत केबल लाईनध्ये बिघाड झाल्यानं झाली. यानंतर रहिवाशांना इमारतीच्या बाहेर काढण्यात आलं आहे.
श्रीलंकेत पाकिस्तानची पुनरावृत्ती, राजपक्षे सरकार संकटात; विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here