पुणे : वापगावचा जो किल्ला आहे तो राज्य सरकारने ताब्यात घ्यावा आणि त्यांचं सवंर्धन जतन करावं अशी मागणी करण्यासाठी यशंवत ब्रिगेडच्यावतीने आंदोलन करण्यात आलं आहे. त्या आंदोलनात भाजप नेते गोपीचदं पडळकरांनी देखील भेट दिली. यावेळी पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

ते म्हणाले की, एका किल्ल्यासाठी वेगळी आणि दुसऱ्या किल्ल्यासाठी तुम्ही दुसरी भूमिका कशासाठी घेता? ती पुरातन वास्तू असल्यानं त्याचं सवंर्धन, जतन झालं पाहिजे. थोरले सुभेदार मल्हारराव होळकरांनी ती वास्तू बांधली आहे. या वास्तूमध्ये इंग्रजांना सलग २५ वर्ष हरवणाऱ्या यशवंत होळकरांचा जन्म झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांच्या भावना त्या किल्ल्याप्रती खूप भावनिक असल्याने तो किल्ला ताब्यात का घेतला जात नाही, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

राजकारण तापलं! राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेला विरोध; सभा घेतल्यास….
पडळकर पुढे म्हणाले की, ‘१९६५ साली रयत शिक्षण संस्थेने शिक्षणाच्या चांगल्या कामासाठी दिला आहे. प्रसार माध्यमातून रयत शिक्षण संस्थेतील घोटाळ्याच्या बातम्या आपण बघत आलो आहे. त्या संस्थेचा आता वटवृक्ष झाला असून त्याबाबत भुमिका का घेतली जात नाही ? जेजरी संस्थांनी उभारलेल्या पुतळ्याच्या उद्घाटानासाठी राजकारण करता, सांगलीतील कुपवडा महानगरपालिकेने बांधलेल्या पुतळ्यासाठी राजकारण करता आणि याकडे आम्ही टाहो फोडून सांगतो की हा किल्ला सरकारच्या ताब्यात द्यावा, त्यावर पाच पन्नास कोटी खर्च करा. त्याबद्दल एक अक्षर पण नाही म्हणजे बोलायचे एक आणि करायचे एक असं झालं आहे.’

पवारांची भूमिका दुटप्पी’

तर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात राज्य सरकारकडून खोटं सांगितलं जात आहे. २०१९च्या जाहीरनाम्यात राष्ट्रवादीने एसटी विलिनीकरणाचा मुद्दा मांडला होता. विश्वासघाताने सरकार आल्यानंतर कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांचा अधिवेशनात शरद पवारांनी याबाबत सांगितलं होतं. तसेच शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचं आम्ही समर्थन करीत नाहीत. परंतु पवारांची भूमिका दुटप्पी आहे. माझ्या गाडीवर हल्ला होतो. तेव्हा त्या कार्यकर्त्यांच्या डोक्यावर तुम्ही हात ठेवतात. कर्मचारी तुमच्या घराकडे चालून आले. त्याचा तुम्ही का अभ्यास केला नाही, असा थेट सवाल पडळकरांनी विचारला.

‘एकनाथ खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलं’, गिरीश महाजनांची घणाघाती टीका
इतकंच नाहीतर ते पुढे म्हणाले की, ‘एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी शरद पवारांवर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. कारण, तुम्ही ५० वर्ष त्या लोकांचं नेतृत्व केलं. विलिनीकरणाची आशा त्यांनी लावली. दुसऱ्यांच्या घरावर दगड टाकल्यावर त्यांचं अभिनंदन करायचं आणि स्वत:च्या घरावर दगड फेकल्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचे’ असाही घणाघात पडळकरांनी यावेळी केला.

Electricity Bill : राज्यात वीज बिलासाठी आता प्रीपेड कार्ड येणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here