मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचं १४ एप्रिल रोजी थाटामाटात लग्न झालं. त्यानंतर या लग्नसोहळ्यातील काही फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. जिथं बघावं तिथं आलिया आणि रणबीरच्या लग्नाचे फोटो आणि त्याची चर्चा सुरू आहे. या दोघांचं लग्न अत्यंत साधेपणानं झालं. या लग्नात सहभागी झालेल्या करण जोहरनं त्याला आलेला मजेशीर अनुभव या कार्यक्रमात सर्वांना सांगितला.

आलिया रणबीर लग्न

आलिया आणि रणबीर यांच्या लग्नापूर्वीचे विधी आणि लग्नसोहळा ‘वास्तू’मध्येच झाले आहे. या लग्नसोहळ्याला केवळ दोन्ही कुटुंबातील जवळचे सदस्य आणि मित्रमंडळीच उपस्थित होते. करण जोहरचं कपूर कुटुंबाबरोबर खूप जवळचं नातं आहे. त्यामुळे अर्थातच तो देखील या लग्नसोहळ्यात सहभागी झाला होता. हुनरबाज कार्यक्रमाच्या चित्रीकरणावेळी भारती सिंगनं लग्नाचा विषय काढला. यावेळी भारतीनं करणची मस्करी करत म्हणाली की, ‘या लग्नातला सगळ्यात पहिला फोटो तुमचाच आला होता. गुलाबी रंगाच्या ड्रेमध्ये पिंकी पिंकी दिसत आहे.’ त्यावर परिणीती चोप्रानं करणचा हात दाखवत म्हणाली त्यानंही हातावर मेंदी काढली आहे. करणच्या दोन्ही हातांवर मेंदी होती. त्यानंतर करणनं सगळ्यांना मेंदीशी निगडीत असलेला एक मजेशीर किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकल्यावर सगळेजण हैराण झाले.

Video- सलमानचं डोकं आपटू नये म्हणून बाबा सिद्दीकी धावले

करणची मेंदी विस्कटली

आलिया आण रणबीरच्या मेंदी सोहळ्यामध्ये करणनं देखील हातावर मेंदी काढायचं ठरवलं. त्यानंतर त्यानं हातावर मेंदी देखील काढली. करणनं पहिल्यांदाचा हातावर मेंदी काढली होती. थोड्या वेळानं आपण हातावर मेंदी काढली आहे, हेच तो विसरून गेला. त्यानंतर करणनं मेंदी काढलेला हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवला. मग काय झालं असेल याचा अंदाज सगळ्यांना आला आणि सेटवरचे सगळेजण पोट धरून हसू लागले. कारण करणनं असं केल्यामुळे त्याच्या हाताची मेंदी चेहऱ्याला लागली. त्यानंतर आलियाचा मेकअप आर्टिस्ट पुतीन करणच्या मदतीला धावली.

करणनं त्याबद्दल सांगितलं की, ‘मी कधीही हाताला मेंदी लावत नाही. उन्हाळ्यामुळे मला खूप घाम आला होता. तो मी हातानं पुसला. माझ्या हाताला मेंदी आहे हे मी पार विसरून गेलो. मग ती हाताची मेंदी माझ्या डोक्याला, कपाळाला, संपूर्ण चेहऱ्याला लागली. त्यानंतर मी तातडीनं जाऊन हाताची आणि चेहऱ्यावरची मेंदी धुतली. सुदैवानं आलियाचा मेकअप करणारी तिथं पुतीन होती. ती मला लगेचच आतमध्ये घेऊन गेली आणि तिनं काही तरी लोशन आणि अनेक गोष्टी माझ्या चेहऱ्यावर लावल्या. त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरून मेंदी निघून गेली. नाहीतर संपूर्ण मेंदी माझ्या चेहऱ्यावर रंगली असती.’

मुनव्वर फारुकी वादाच्या भोवऱ्यात, अभिनेत्रीला चुकीचा स्पर्श करणारा Video Viral

आलिया रणबीर

करणनं सांगितलेला हा किस्सा ऐकून सर्वजण हैराण झाले. भारतीनं मात्र करणची गंमत करत म्हणाली, ‘बरं झालं त्यांनी तुमचा मेकअप केला आणि मेंदीचा रंग तुमच्या चेहऱ्यावर उतरला नाही. नाहीतर लोकांना वाटायचं कुणी तरी तुमच्या चेहऱ्यावर पान खाऊन पिचकारी मारली आहे.’ हे ऐकून सर्वजण हसू लागतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here