लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन (Boris Johnson) हे २१ एप्रिलपासून भारताच्या (India) दौऱ्यावर येणार आहेत. बोरिस जॉनसन यांच्यावर विरोधकांनी पार्टीगेट स्कँडलचा आरोप केला आहे. जॉनसन यांच्यावर विरोधकांनी आरोपांची राळ उडवली आहे. करोना (Corona) विषाणू संसर्गाच्या काळात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. त्या दरम्यान सरकारी अधिकाऱ्यांकडून नियमांचं उल्लंघन करत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
धक्कादायक: हनुमान जयंती हिंसाचारातील आरोपीचा शोध घेत असतानाच…
जॉनसन यांना एका पार्टी प्रकरणी एकदा दंड ठोठावण्यात आला आहे. ही पार्टी जून २०२० मध्ये आयोजित करण्यात आली होती. बोरिस जॉनसन यांच्या पत्नी कॅरी यांनी कॅबिनेट कार्यालयात केक आणला होता. याप्रकरणी कॅरी आणि ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांना दंड ठोठावण्यात आला आहे. ब्रिटीश माध्यमांच्या माहितीनुसार पोलीस लॉकडाऊन काळातील १२ पार्टी प्रकरणी तपास करत आहे. यामधील सहा प्रकरण बोरिस जॉनसन यांच्याशी संबंधित आहेत.
दिल्लीच्या मिचेल मार्शला कशी झाली करोनाची लागण, जाणून घ्या नेमकं घडलं तरी काय…
द संडे टाईम्सनं सूत्रांच्या हवाल्यानं नोव्हेंबर २०२० मध्ये १० डाऊनिंग स्ट्रीट येथे एका बोरिस जॉनसन यांच्या सांगण्यावरुन एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. पहिल्यापासून पार्टीगेट प्रकरणावरुन राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षांनी जॉनसन यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मजूर पक्षाच्या उपनेत्या एंजेला रेनर यांनी नवा अहवाल खरा असल्यास खरा बोरिस जॉनसन यांनी पार्टीमध्ये केवळ सहभाग घेतला नाही तर त्यांनी आयोजन देखील केल्याचा आरोप केला आहे.

चांगल्या नेतृत्त्वाची गरज
रेनर यांनी जॉनसन यांच्यावर हल्लाबोल केला आहे. जॉनसन यांनी प्रत्येक वेळा नागरिकांची फसवणूक केली आहे. ब्रिटनची जनता बलिदान देत असताना बोरिस जॉनसन कायदा तोडत होते, असा आरोप रेनर यांनी केला. पंतप्रधानांनी त्यांच्या कार्यालयाचा अपमान केला आहे. ब्रिटीश जनतेला चांगल्या नेतृ्त्त्वाची गरज आहे.

बोरिस जॉनसन २१ एप्रिलपासून भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. भारत भेटीमध्ये ते गुजरातला जाणार आहेत. गुजरातमधील अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी आणि बोरिस जॉनसन यूक्रेन रशिया युद्धासह इतर विषयांवर चर्चा करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here