औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या मुंबईतील घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सिल्व्हर ओकवरील हल्ला हा माझ्या आईवर झालेला हल्ला होता. माझ्या आईवर झालेला हल्ला म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रावर झालेला हल्ला आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. त्या औरंगाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

इतकंतच नाहीतर सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंच्या भोंग्यावरील मुद्दावरही भाष्य केलं आहे. सुरुवातील त्या राज ठाकरे मनोरंजन करतात असं म्हणाल्या होत्या. पण नंतर पत्रकार परिषदेत ‘मी राज ठाकरे यांना मनोरंजन वगैरे बोलले नाही. मी असं काही बोललेलं मला आठवत नाही. आमच्या कुटुंबियांवर बोलणं ही मोठी बातमी असते, त्यामुळं लोक बोलतात ठीक आहे. राज ठाकरे आणि सभा मला त्यात जास्त काही बोलायचं नाही. प्रत्येक संघटनेला बोलायचा हक्क आहे आणि ते बोलतात. कुणाला कुठं जायचं आहे त्यांना तिथं जाऊ दे. सुप्रिया काहीच बोलत नाही. आमच्या तोंडात शब्द घालू नका, हाथ जोडून विनंती’ असंही यावेळी त्यांनी म्हटलं.

राजकारण तापलं! राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेला विरोध; सभा घेतल्यास….
सुप्रिया सुळेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे…

– अनिल देशमुख साहेबांवर १०३ रेड झाल्या आहेत हे विक्रम आहे

– माझ्या बैठकीत का घुसले? बातम्या बाहेर कशा आल्यात? म्हणून सुप्रिया सुळे पत्रकारांवर नाराज

– राजकारणात हनुमान एन्ट्री यावर कोण कसा आणी काय बोध घेईल कळत नाहीये

– छापे मारण्याचा विक्रम सुरू आहे.

– दंगली होणार नाही यासाठी आपण सगळ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करायला हवे. सिल्व्हर ओकवर हल्ला म्हणजे माझ्या आईवर हल्ला होता.

– ज्या महिला त्या हल्ला प्रकरणात अटकेत आहे. त्यांना मला भेटायचं आहे. मी पोलिसांना विनंती केली आहे. त्या का माझ्या घरी आल्या होत्या? या पद्धतीने ही आपली संस्कृती नाही.

– जेव्हा माझ्या घरावर हल्ला झाला. माझ्या मुलीने आणि आईने तातडीने पडदे बंद केले, तरी सुद्धा हे काय झालं कळायला मार्ग नाही. त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्या सोडवायचा प्रयत्न व्हायला हवा.

– यातून फक्त नुकसान आणि नुकसान होतं आहे, हे सगळं अस्वस्थ करणारं आहे.

– दिल्लीत आणि इतर ठिकाणी झालेली दंगलेने मी अस्वस्थ झाली आहे. हे कुणासाठी चांगलं नाही. यातून अर्थवावस्थेला फटका बसतो.

– काश्मीर फाइल्स हा वेदना देणारा सिनेमा आहे. तिकडे सगळे छान राहतात सुधारले आहे. त्या समाजबाबत जर तुम्हाला इतकं प्रेम आहे तर जम्मू काश्मीरच्या बजेटमध्ये काहीतरी टाका, बजेटमध्ये काहीच तुम्ही घेतलं नाहीये.

‘पवारांची भूमिका दुटप्पी, माझ्या गाडीवर हल्ला झाला तेव्हा…’; गोपीचंद पडळकरांचा घणाघात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here