पुणे (लोणावळा) : कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या पिकअपची पुढे जाणाऱ्या ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात १ जण ठार आणि २ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी पहाटे साडेपाच वाजता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मळवलीजवळील देवले गावाच्या हद्दीतील पुलाजवळ झाला. इजाक रसुल मुगले (वय ४२, रा. उमरगा, उस्मानाबाद) असे अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. नागेश काशीनाथ करमुखले (वय ३२) आणि इरफान जब्बार मकाने (वय २५, दोघेही रा. शिळफाटा, ठाणे) अशी जखमींची नावे आहेत.

असा झाला अपघात…

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुगले उस्मानाबादहून मुंबईकडे पिकअपमधून कोंबड्या घेऊन जात होते. देवले गावाच्या हद्दीत त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने‌ पिकअप पुढे जाणाऱ्या ट्रकवर धडकली. यामध्ये मुगले यांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा महामार्ग पोलिस व लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ‌‌‌‌व देवदूत आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तत्काळ उपचारासाठी ओझर्डे येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले.

राज्यात भोंग्यांबाबत लवकरच निर्णय; दोन दिवसांत नियमावली जारी करणार
पवना हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले….

प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमींना सोमाटणे येथील पवना हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी ‘आयआरबीआय’ कंपनीच्या कामगारांच्या मदतीने व क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मळवलीजवळील देवले गावाच्या हद्दीतील पुलाजवळ पिकअप व ट्रकचा अपघात झाला. यामध्ये पिकअपचे मोठे नुकसान झाले.

सियाचीनमध्ये होणार गणपती बाप्पा मोरयाचा गजर, श्रीं ची प्रतिकात्मक मूर्ती सुपूर्द

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here