धरणगाव तालुक्यातील एका गावात नातेवाईकांना भेटण्यासाठी प्रभाकर रघुनाथ सूर्यवंशी हे पत्नी व मुलांसह दुचाकीने गेले होते. भेट झाल्यानंतर दुचाकीने परत जात असतांना धरणगाव तालुक्यातील रोटवद गावाजवळ रात्री ८.३० वाजेच्या सुमारास अंधारात बैलगाडी दिसली नाही. त्यावर सुर्यवंशी यांची दुचाकी जावून धडकली. या अपघातात दुचाकीवरील प्रभाकर सुर्यवंशी व त्यांची मुलगी नायरा हिचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी ममता व मुलगा मोहित हे जखमी झाले. धडक एवढी जोरदार होती की, यात संपूर्ण दुचाकी चक्काचूर झाली.
जखमींना रूग्णालयात दाखल केले…
अपघाताची माहिती मिळताच धरणगावचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्यासह कर्मचारी सहाय्यक पोलीस निरिक्षक जितेंद्र पाटील, पोलीस नाईक दिपक पाटील, विनोद संदानशिव, विजय धनगर यांनी घटनास्थळी धाव घेतली. व जखमींना धरणगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत धरणगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झालेली नव्हती.