सदर व्यक्तीला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. किरकोळ जखमी झाल्याने प्रथम उपचार करण्यात आले. त्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यास सांगितल्यानंतर सदर व्यक्तीने रुग्णालयात जाण्यास नकार दिला. दरम्यान, रोशन जाधव यांच्या कौतुकास्पद कामाचे सर्वजण कौतुक करत आहेत. तसेच धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना होणारे अपघात आणि अशा अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची दिवसेंदिवस वाढती संख्या या दोन्ही बाबी रेल्वे प्रशासनासाठी चिंताजनक अशाच आहेत. यासाठीच रेल्वेकडून वारंवार धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करू नका, असं आवाहन केलं जातं आहे.
एमएसएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण…
खाली पडलेल्या या व्यक्तीने दरवाजा एका हाताने धरलेला होता. काही अंतरावर तो ट्रेनसोबत फरफटत गेला. मात्र, शेवटी त्याचा हात सुटला आणि तो दरवाजा आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या जागेत जाऊ लागला. या व्यक्तीचं डोकं आधी त्या जागेत जाऊ लागलं. मात्र, वेळीच तिथे एमएसएफचे जवान रोशन जाधव आणि सुरक्षा बलातील एका महिला कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत त्या व्यक्तीला पायाला धरून खेचून बाहेर काढलं. त्यामुळे या प्रवाशाचा जीव वाचला.