नवी दिल्ली :रशिया (Russia) आणि यूक्रेन (Ukriane) यांच्यातील युद्ध आणखी धोकादायक स्थितीत पोहोचलं आहे. रशियानं पूर्व यूक्रेनमधील हल्ले वाढवले आहेत. मारियुपोलवर सातत्यानं हल्ले केले जात आहेत. यूक्रेनच्या प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार रशियाच्या हल्ल्यात इरपिनमध्ये २६९ जणांचा मृत्यू झाला आहे. लवीवमध्ये रशियानं मिसाईल हल्ला केला त्यात सात यूक्रेन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रशियाकडून हल्ले वाढवले गेल्यानं यूक्रेनच्या नागरिकांसाठी एअर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नारायण राणेंच्या बंगल्याला महापालिकेची पुन्हा नोटीस; बांधकाम न पाडल्यास कारवाई
यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाच्या सैनिकांनी डोनबासमध्ये लढाई सुरु केल्याची माहिती दिली. डोनबासमध्ये रशियानं कितीही सैनिक तैनात केले तरी आम्ही आमच्या प्रदेशाचं संरक्षण करु, असं झेलेन्स्की म्हणाले. आम्ही रशियाविरुद्ध लढू मात्र यूक्रेन रशियाच्या ताब्यात जाऊ देणार नाही, असं झेलेन्स्की म्हणाले. दुसरीकडे डोनेत्स्क भागात गोळीबार सुरु आहे.
‘सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्व’, पुण्यात राज ठाकरेंच्या विरोधात पोस्टरबाजी
लवीव शहरात रशियाकडून मिसाईल हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. यूक्रेननं रशियाच्या ताब्यात असणाऱ्या खेरसॉन आणि क्रीमिया हा भाग सोडून एअर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यूक्रेनच्या पूर्व भागात रशियाकडून हल्ले करण्यात येत आहेत.
यूक्रेनच्या संरक्षण दलाकडून रशियन सैन्याकडून हल्ले वाढवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. रशियाच्या ताब्यातील क्रीमिया आणि सीमावर्ती रोस्टोव ओब्लास्टमध्ये रशियानं अतिरिक्त सैन्याची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे. आता युद्धाचा दुसरा टप्पा सुरु झाल्याची माहिती आहे. यूक्रेनच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण परिषदेचे प्रमुख डॅनिलोव यांनी आज सकाळी डोनेत्स्क, लुहांस्क, खारकीवमध्ये रशियन सैन्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती त्यांनी दिली.

इरपिनमध्ये २६९ नागरिकांचा मृत्यू
कीवच्या वायव्येकडील भागातील इरपिन शहरात रशियाच्या हल्ल्यात २६९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. इरपिन शहरावर रशियानं ताबा मिळवला होता. मात्र, मार्च महिन्याच्या अखेरीस यूक्रेनच्या सैन्यानं पुन्हा ताबा मिळवला. कीवच्या भागातील बुचामध्ये रशियामधील विरोधी पक्षनेते एलेक्सी नवाल्नी यांची नातेवाईक इल्या नवाल्नी यांचा गोळी लागून मृत्यू झाला होता. बुचामध्ये रशिया आणि यूक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर संघर्ष झाला होता.

मारियूपोलमधील माध्यमांच्या माहितीनुसार रशियाकडून अझोवत्साल या कंपनीवर हल्ले करण्यात येत आहेत. या कंपनीत महिला आणि मुलांनी आश्रय घेतला आहे. यूक्रेनच्या माध्यमांच्या माहितीनुसार कीवमधील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. कीवमध्ये अनेक परकीय देशांची उच्चायुक्त कार्यालय सुरु झाले आहेत. दरम्यान, रशियाच्या निशाण्यावर कीव असल्याची माहिती आहे. कीववर रशियानं हल्ले वाढवल्यानं उच्चायुक्त कार्यालय बंद करण्यात आली होती.
जिओचा हा प्लान आहे बेस्ट! फक्त ८९९ रुपयात ३३६ दिवसांची वैधता; वर्षभर मिळेल डेटा-कॉलिंगसह अनेक फायदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here