परभणी: कोल्हा ते झिरोफाटा या राष्ट्रीय महामार्ग ६१ वरील रस्त्याचे काम गेल्या ५ वर्षांपासून पूर्ण करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे सन २०१७ ते २०२१ या कालावधीत राष्ट्रीय महामार्ग ६१ वर २१८ अपघात झाले असून त्यामध्ये तब्बल ११३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. साहुत्रे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिला आहे.

काय म्हटले आहे पत्रात…

कोल्हा ते झिरोफाटा या राष्ट्रीय महामार्ग ६१ रस्त्याचे काम गेल्या पाच वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे या रस्त्यावर अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे जनतेमध्येही मोठी नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी १३ नांदेड येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. साहुने यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सन २०१७ ते २०२१ या कालावधीत राष्ट्रीय महामार्ग ६१ वर २१८ अपघात झाले आहेत. त्यामध्ये ११३ जणांचा मृत्यू झाला आहे. असा अहवाल उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे. परिणामी काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी एजन्सी नियुक्त करावी. महामार्गावरील अर्धवट काम ७ जून तुम्ही पूर्ण करावे. काम पूर्ण न झाल्यास फौजदारी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असे पत्रात जिल्हाधिकारी अंचल गोयल यांनी म्हटले आहे.

मुंबईत तुमची ताकद नाही, म्हणूनच कोणालातरी पकडून…; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?
अन्य रस्त्यांबाबतही अशीच भूमिका राहणार का?

जिल्हाधिकारी गोयल यांनी झिरोफाटा ते कोल्हा या रस्त्याच्या प्रलंबित कामाबाबत आता कठोर भूमिका घेतली असली, तरी जिल्ह्यातील इतर प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामाबाबतही त्या अशीच भूमिका घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण परभणी गंगाखेड, परभणी – जिंतूर या मुख्य रस्त्याची कामे गेल्या अनेक वर्षापासून पूर्ण झालेले नाही.

राज्यात भाजपचं सरकार असताना भोंगे का उतरवले नाहीत?; प्रवीण तोगडियांचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here