मुंबई : प्रेमाचा त्रिकोण हा विषय काही हिंदी सिनेमाला नवीन नाही. सिनेमा पडद्यावर आल्यापासून एक नायिका दोन नायक किंवा दोन नायिका एक नायक आणि त्यांच्यातील प्रेम या विषयावर आजवर अनेक कथा आल्या. अर्थात प्रत्येक सिनेमाची मांडणी वेगळी असली तरी प्रेमाचा त्रिकोण हा विषय ऑल टाइम फेव्हरेट असतो. १९९८ साली झळकलेल्या कुछ कुछ होता है या सिनेमानेही हाच प्रेमाचा त्रिकोण यशस्वी करून दाखवला. रोमँटिक म्युझिकल कॉमेडी कुछ कुछ होता है या सिनेमाने ज्या राणी मुखर्जी या अभिनेत्रीला रातोरात स्टार केलं ती टीना ही भूमिका राणी मुखर्जीला नव्हे तर मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायला ऑफर झाली होती. पण दिग्दर्शक करण जोहरची तीच ऑफर नाकारल्याने ऐश्वर्याच्या हातातून हा ब्लॉकबस्टर सिनेमा निसटला.

कुछ कुछ होता है

२४ वर्षापूर्वीचा हा सीन आहे. पण कोट्यवधींचा गल्ला जमवणारा कुछ कुछ होता है हा सिनेमा का नाकारला याचं कारण ऐश्वर्याने फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत २४ वर्षांनंतर सांगितलं आहे. १९९८ साली ऐश्वर्या ही फिल्म इंडस्ट्रीत नवीन होती. कुछ कुछ होता है या सिनेमाची ऑफर ऐश्वर्यासाठी करण जोहरने आणली, तेव्हा ऐश्वर्याने तीन ते चार सिनेमेच केले होते. त्यावेळी काजोल लोकप्रियतेच्या शिखरावर होती तर राणी मुखर्जीने अजून खातंच उघडलं नव्हतं. शाहरूख आणि काजोल ही जोडी तर हिट होतीच. ऐश्वर्या जरी नवीन असली तरी विश्वसुंदरीचा किताब मिळवून ती अभिनयात आल्याने तिची तुलना त्यावेळी स्थिरावलेल्या नायिकांशी केली जात होती. त्यामुळे ऐश्वर्या भूमिका निवडण्यामध्ये फारच चोखंदळपणा करत होती.

दाक्षिणात्य सिनेमे देशभरात हिट, बॉलिवूड निर्मात्यांना मोठा फटका

ऐश्वर्या राय

करियरच्या त्याच वळणावर कुछ कुछ होता है या सिनेमातील टीनाच्या भूमिकेसाठी ऐश्वर्याला विचारण्यात आलं आणि तिने करण जोहरला नकार कळवला. त्यानंतर रवीना टंडन, करिश्मा कपूर, ट्विंकल खन्ना, ऊर्मिला मातोंडकर यांनाही ही भूमिका ऑफर करण्यात आली होती. पण अखेर राणी मुखर्जीने या भूमिकेला ग्रीन सिग्नल दिला आणि त्याच भूमिकेने राणी मुखर्जीची यशस्वी सुरूवात केली. दहा कोटी रूपयांमध्ये बनवला गेलेला हा सिनेमा इतका गाजला की २४ वर्षापूर्वी या सिनेमाने देशात ८० कोटी तर जगात १०६ कोटींचा गल्ला जमवला. चांगली स्टोरी, करण जोहरसारखा यशस्वी दिग्दर्शक असूनही ऐश्वर्याने हा सिनेमा का नाकारला या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळत नव्हतं. अखेर फिल्मफेअरसाठी दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने यावरचं मौन सोडलं.

ऐश्वर्या करण जोहर

ऐश्वर्या म्हणाली, ‘कुछ कुछ होता है या सिनेमातील टीनाच्या भूमिकेची ऑफर ऐकल्यानंतर मला असं वाटलं की लोक माझी चेष्टा करतील. जे मी माझ्या मॉडेलिंग काळात करत होते त्याप्रमाणे मिनी स्कर्ट घालून, केस मोकळे सोडून स्क्रीनवर दिसले तर लोक मला गंभीरपणे घेणार नाहीत. शिवाय टीना हा लीड रोल नव्हता. हिरो शेवटी लीड नायिकेकडे जाणार आणि टीना हे पात्र सिनेमाच्या अर्ध्या प्रवासापर्यंतच होत. हाच विचार करून मी ती भूमिका नाकारली.’

Lock Upp : ‘आईनं अॅसिड पिऊन आत्महत्या केली,’ मुनव्वर फारुकीचा अनुभव ऐकून कंगनाही रडली

शाहरुख खान राणी मुखर्जी

करण जोहर आणि ऐश्वर्या राय यांना एकत्र काम करण्याची संधी ऐश्वर्याच्या नकाराने गेली असली तरी पुन्हा या जोडीला एकत्र काम करायला तब्बल १७ वर्ष जावी लागली. १९९८ साली वेगळ्या झालेल्या करण आणि ऐश्वर्या यांच्या वाटा जुळल्या त्या १७ वर्षांनी, जेव्हा करणने ए दिल है मुश्किल हा सिनेमा केला. या सिनेमात ऐश्वर्या रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली आणि या सिनेमाचा कॅप्टन ऑफ द शिप होता करण जोहर. अभिनेत्री आणि दिग्दर्शक यांच्यातील नकार-होकाराची भट्टी जमायला १८ वर्ष जावी लागली आणि आधीच्या नकाराचं कारण सांगण्यासाठी २४ वर्षांनी चुप्पी तुटली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here