मुंबई : मराठी मनोरंजन विश्वात लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये ऋतुजा बागवे हिचा देखील समावेश होतो. अभिनयाबरोबरच ऋतुजा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ऋतुजा तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधत असते. ऋतुजानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो पोस्ट करत किचनमध्ये काम करताना तिला झालेल्या अपघाताची माहिती दिली. या फोटोंमध्ये तिच्या गळ्यावर आणि हातावर भाजल्याच्या खुणा दिसत आहेत.

ऋतुजा बागवे

ऋतुजानं सोशल मीडियावर तिचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ऋतुजाच्या गळ्यावर आणि हातावर भाजल्याचं दिसत आहे. अर्थात हे फोटो शेअर करताना ऋतुजानं तिचा अपघात नेमका कसा झाला याबद्दल काही सांगितलेलं नाही. परंतु स्वयंपाक घरात काही तरी काम करत असताना तापलेलं तेल ऋतुजाच्या हातावर आणि मानेवर उडाल्यानं तिला भाजलं आहे. ऋतुजानं जे फोटो पोस्ट केले आहेत. त्यामध्ये जिथं तिला भाजलं आहे तिथं औषध लावल्याचं दिसतं आहे. याचा अर्थ तिला झालेल्या जखमा हळूहळू बऱ्या होत आहेत.

रूपाली भोसलेच्या पायातून भळाभळा वाहू लागलं रक्त, सेटवर नेमकं झालं तरी काय?

ऋतुजाच्या कामाबाबत सांगायचं तर ‘अनन्या’ हे तिचं नाटक खूपच गाजत आहे. या मालिकेत तिनं एका दिव्यांग मुलीची भूमिका साकारली आहे. या नाटकातील ऋतुजाच्या कामाचं भरभरून कौतुक होत आहे.

‘लोकांनी माझी चेष्टा केली असती,’ ऐश्वर्यानं नाकारली होती करण जोहरची ऑफर, २४ वर्षांनी सांगितलं कारण


ऋतुजानं २००८ मध्ये ह्या गोजिरवाण्या घरात मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिनं स्वामिनी, मंगळसूत्र, एका लग्नाची तिसरी गोष्ट, तू माझा सांगाती या मालिकांमध्ये काम केलं होतं. ऋतुजाला खऱ्या अर्थानं लोकप्रियता मिळाली ती ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेमुळे. यामध्ये तिनं स्वानंदी देशपांडे ही भूमिका साकारली होती. ही मालिका २०१५ मध्ये झी मराठीवरून प्रसारित होत होती. त्यानंतर ऋतुजानं २०२१ मध्ये प्रसारित झालेल्या चंद्र आहे साक्षीला या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं. या मालिकेत तिच्याबरोबर सुबोध भावे, आस्ताद काळे हे कलाकार होते. ही मालिका प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here