हिंगोली : हिंगोली शहरातील तलाब कट्टा भागात मुलीच्या छेडछाडीचा बदला घेण्यासाठी एका तरुणाचा गुप्ती व खंजीरने क्रूरतेने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुभम राजे वय २३ वर्ष असे मृत तरुणीचे नाव असून याप्रकरणी आज सकाळी तिघा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तात्काळ कोम्बिंग ऑपरेशन राबवत तिघांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील तलाब कट्टा भागात मृत शुभम राजे आणि बबलू धाबे यांच्यात काही दिवसांपूर्वी मुलीच्या छेडछाडीवरून वाद निर्माण झाला होता. मात्र, हा वाद लगेचच मिटला. सोमवारी या वादाचा बदला घेण्यासाठी बबलू धाबे व त्याच्यासोबत अन्य दोघेजण रात्री साडेनऊ ते दहा वाजताच्या सुमारास तलाब कट्टा परिसरात आले. यावेळी शुभमला बोलावून घेत त्याच्यावर खंजीर व गुप्तीने, लोखंडी पाईपने सपासप वार केले. बारामती हादरलं! सख्ख्या बहिण-भावाने एकत्रच गमावले प्राण, मृत्यूचं कारण वाचून मन सुन्न होईल अचानक झालेल्या हल्ल्यामुळे शुभम जागीच कोसळला. त्यानंतर तिघही फरार झाले. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून अफवांना उधाण आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिक्षक यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक पंडित कचवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसाब घेवारे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
याप्रकरणी शुभम राजे यांच्या आई शोभा राजे यांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात बबलू धाबे व अन्य दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.