मुंबई : रेखा म्हटलं की आजही नव्वदी गाठलेल्या प्रेक्षकांना त्यांचे तारुण्याचे दिवस आठवतात. एकसे एक साड्यांचं कलेक्शन, वयाच्या सत्तरीतही तरूणींना लाजवेल असा उत्साह आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रचंड संघर्ष करून इथपर्यंत येत असतानाही टिकवून ठेवलेलं चेहऱ्यावरचं बहारदार हास्य म्हणजे रेखा. पण याच अभिनेत्री रेखा यांच्याबाबतीत वयाच्या १४ व्या वर्षी सिनेमाच्या सेटवर अशी काही घटना घडली की आजही त्या विसरू शकलेल्या नाहीत.

रेखा

आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे सिनेमात काम करण्याशिवाय पर्याय नसलेल्या रेखा यांच्या एका नायकाने किसिंग सीन कट म्हटल्यानंतरही सुरूच ठेवला. त्या सहकलाकार नायकाचं वर्तन इतकं अश्लील होतं की रेखा यांच्या डोळ्यात पाणी आलं. पण पहिलाच हिंदी सिनेमा असल्याने या प्रकरणाची वाच्यता केली तर हातातलं काम जाईल म्हणून त्या गप्प राहिल्या. एका मुलाखतीत मी टू चळवळीच्या अनुषंगाने रेखा यांनी ती जुनी आठवण सांगितली.

PHOTOS: परिणीती चोप्रा रमली वडिलांच्या शेतात

रेखा

रेखा यांचे वडील त्यांच्या सोबत नसल्याने आणि तेलगू अभिनेत्री असलेल्या आईलाही कामं मिळणं बंद झाल्याने रेखा यांनी खूप लहान वयातच सिनेमात काम करायला सुरूवात केली. खरं तर त्यांना सेटवर जायला आवडायचं नाही. त्यावेळी परिस्थितीची जाणीव करून देत त्यांचा भाऊ सेटवर जायला भाग पाडायचा. कुटुंबावर कर्ज होतं आणि त्यासाठीच रेखा यांनी खूप संघर्ष करत बॉलिवूडमध्ये स्थान मिळवलं आहे. पण रेखा यांनी आज हे लोकप्रियतेचे यशस्वी शिखर गाठलं असलं तरी त्यांनी सिनेमा क्षेत्रातील चुकीच्या गोष्टी खूप जवळून पाहिल्या व अनुभवल्या आहेत. काम देण्यासाठी अभिनेत्रीकडे केली जाणारी अनैतिक मागणी यावरून काही वर्षापूर्वी मी टू हा ट्रेंड आला. अनेक अभिनेत्री याविषयी व्यक्त झाल्या. या गोष्टीमुळेच सिनेमा इंडस्ट्रीकडे सुरक्षित क्षेत्र म्हणून पाहिलं जात नाही, हे रेखा यांच्या आयुष्यातील त्या प्रसंगाने खरं केलं आहे.

‘लोकांनी माझी चेष्टा केली असती,’ ऐश्वर्यानं नाकारली होती करण जोहरची ऑफर

रेखा

१९६९ साली रेखा यांना हिंदी सिनेमांच्या ऑफर येऊ लागल्या. त्यामध्ये अंजाना सफर या सिनेमात काम करण्यासाठी रेखा यांची निवड झाली होती. अभिनेता विश्वजित हा त्यांचा नायक होता आणि त्यावेळी रेखा यांचं वय १४ वर्ष होतं. सिनेमातील किसिंग सीन सुरू असताना दिग्दर्शकाने कट असं म्हटलं तरी विश्वजित न थांबता रेखा यांना किस करत राहिले. यामुळे रेखा यांना वेदना होऊ लागल्या आणि त्यांना रडूच फुटलं. खरं तर या सीनविषयी रेखा यांना आधी कोणतीही कल्पना दिली नव्हती. पण त्याविषयी तक्रार केली तर सिनेमातील भूमिका काढून घेतली जाईल, या भीतीने त्यांनी ती गोष्ट कोणालाच सांगतली नाही.

रेखा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here