राज ठाकरे लेटेस्ट न्यूज़: राज ठाकरेंच्या सभेला आणखी एका पक्षाकडून विरोध, थेट पोलिसांना लिहलं पत्र – opposition to raj thackeray meeting from vanchit bahujan aghadi
औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या सभेला आता वंचित बहुजन आघाडीनेसुद्धा विरोध केला आहे. राज यांच्या औरंगाबादमध्ये होऊ घातलेल्या सभेमुळे शहरातील शांतिप्रिय नागरिक चिंतीत झाले असून, त्यांच्या भाषणामुळे शहराची शांतता व सुव्यस्था बिगडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज यांच्या सभेला परवानगी देऊ अशी मागणी ‘वंचित’कडून करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते अमित भुईगळ यांनी औरंगाबाद पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ज्या मस्जिदवरून अजानचे भोंगे वाजतील त्या ठिकाणी हनुमान चालीसाचे पठण भोंगे लावून करण्यात येईल असं राज ठाकरे म्हणाले आहेत. तर याबाबत त्यांनी महाराष्ट्र सरकारला ३ मे २०२२ पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. त्यांच्या या चेतावणीमुळे राज्यभर भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज यांच्या सभेला परवानगी देऊ नका अशी मागणी वंचितकडून करण्यात आली आहे. राजकारण तापलं! राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेला विरोध; सभा घेतल्यास…. तर कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होईल…
राज ठाकरेंच्या होऊ घातलेल्या सभेमुळे शहरातील शांतिप्रिय नागरिक चिंतीत झाले आहेत. त्यात सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना चालू असून राज ठाकरे यांच्या भाषणामुळे शहराची शांतता व सुव्यस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज यांच्या जाहीर सभेला परवानगी देऊ नयेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.