विशाल भारद्वाज काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्रा हिच्या न्यूयॉर्कमधील रेस्टाॅरंटमध्ये गेले होते. प्रियांकानं विशाल भारद्वाज यांच्या ‘कमिने’, ‘७ खून माफ’ यांसारख्या सिनेमात काम केलं आहे. विशाल यांनी प्रियांकाच्या रेस्टाॅरंटमधील अस्सल देशी खाण्याचं भरभरून कौतुक केलं आहे. अभिनेत्रीनं गेल्या वर्षी ‘सोना’ हे रेस्टाॅरंट सुरू केलं आहे. ती देखील तिथं अनेकदा जाते आणि तिथलं देसी खाणं एन्जॉय करते.
Video: लग्नसोहळ्यात आज्जीबाईंबरोबर बेफाम नाचला रणवीर सिंह
विशालनं शेअर केला फोटो
विशाल भारद्वाजनं ट्विटरवर फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यानं लिहिलं आहे की, ‘मित्रांसोबतची प्रेमळ रात्र आहे आणि न्यूयॉर्कमध्ये सगळ्यात मोठ्या ट्विस्टसह चविष्ट अशा देसी खाण्याचा आस्वाद… #SonaNewYork ‘ या पोस्टमध्ये त्यांनी प्रियांका चोप्राला देखील टॅग केलं आहे.
प्रियांकानं दिली अशी प्रतिक्रिया
प्रियांकानं देखील विशाल यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया देताना लिहिलं आहे की, ‘खूप खूप आनंद झाला की तुम्हाला हे आवडलं सर. तुमचं कधीही इथं स्वागत आहे.’
लवकरच दोघांनी एकत्र काम करावं
ट्विटरवर प्रियांका आणि विशाल यांच्यात झालेल्या या संवादानंतर दोघांच्या अनेक चाहत्यांनी त्यांनी एकत्र काम करावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. काही चाहत्यांनी तर थेट दोघांना प्रश्न विचारला की तुम्ही दोघं पुन्हा एकत्र कधी काम करणार? आणखी एका चाहत्यानं लिहिलं की, ‘प्लीज जास्तीत जास्त सिनेमे करा. तुम्हाला आम्ही मोठ्या पडद्यावर खूप मिस करत आहोत.’
अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी याचं ‘फिर से हनिमून’ रंगभूमीवर

आईपणाचा आनंद घेतेय प्रियांका
प्रियांका आणि निक जोनास हे एका मुलीचे पालक झाले आहेत. या दोघांनी सरोगसीद्वारे एका मुलीला जन्म दिला आहे. त्यामुळे सध्या प्रियांका सोशल मीडिया आणि कामापासून दूर असून ती आईपणाचा आनंद घेते आहे.
प्रियांकाचे आगामी सिनेमे
प्रियांकाच्या कामाबद्दल सांगायचं तर तिच्याकडे अनेक सिनेमे आहेत. त्यामध्ये ‘जी ले जरा’ हा बॉलिवूडमधील सिनेमा आहे. यामध्ये कतरिना कैफ, आलिया भट्ट आहेत. याशिवाय प्रियांकाकडे हॉलिवूडमधील Citadel, Text For You, Ending Things हे सिनेमे आहेत.