मुंबई : ‘लुका चुप्पी’ सिनेमात कार्तिक आर्यन आणि क्रिती सैनन यांनी पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. त्या सिनेमात दोघांमधील केमेस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप आवडली होती. आता प्रदीर्घ काळानंतर हे दोघं जण पुन्हा एकदा ‘शहजादा’ सिनेमात एकत्र दिसणार आहेत. अलिकडेच हे दोघं जण मॉरिशसमध्ये दिसले होते. त्यामुळे या दोघांमध्ये नेमकं काय सुरू आहे, याची चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

कार्तिक आणि क्रिती

कार्तिक आर्यन आणि क्रिती सैननची इन्स्टा पोस्ट

काही दिवसांपूर्वी कार्तिक आर्यननं त्याच्या इन्स्टाग्रामवर क्रितीबरोबरचा एक सुंदरसा फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत त्यानं लिहिलं होतं की, ‘मॉरिशसमध्ये या क्युट मुलीला भेटलो.’ ठरलेल्या शेड्युल्डनुसार हे दोघं जण मुंबईला परतले. त्यानंतर कार्तिकची ही पोस्ट पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.

प्रियांका चोप्राच्या रेस्टॉरन्टमध्ये मिळतं देसी जेवण? वाचा विशाल भारद्वाज यांचा रिव्ह्यू


रस्त्यावर कार्तिक आणि क्रितीनं केली मस्ती

कार्तिक आणि क्रितीनं त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये हे दोघं जण मौजमजा करताना दिसत आहे. हा व्हिडिओ क्रितीनं केला आहे. त्यानंतर कार्तिक तिला म्हणतो की ‘मी टॅन झालेला दिसतोय का?’ त्यावर क्रिती त्याला म्हणते की, ‘तू तसाच आहेस…’ आणि त्यानंतर ते दोघं खळखळून हसू लागतात. या व्हिडिओच्या कॉमेन्ट सेक्शनमध्ये दोघांच्याही चाहत्यांनी त्यांना डेट करण्याचा सल्ला दिला आहे. तर एका चाहत्यानं लिहिलं आहे की, ‘तुम्ही दोघंजण एकमेकांना डेट करायला सुरुवात करा…आम्हाला छान वाटेल…’


क्रिती आणि कार्तिकचे चाहते झाले आनंदित

क्रिती आणि कार्तिकचा व्हिडिओ पाहून एका चाहत्यानं लिहिलं की, ‘तुम्ही दोघंजण एकमेकांसाठी अगदी परफेक्ट आहात. बी टाऊनमधील नवीन कपल?’ २०१९मध्ये हे दोघंजण ऑन स्क्रीन एकत्र दिसले. त्यानंतर आता हे दोघांचा एकत्र व्हिडिओ पाहून चाहत्यांची मनं जिंकली आहेत. त्यांना या दोघांना ‘कारिता’ असं प्रेमानं नाव दिलं आहे. या दोघांमधील केमेस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे. एका चाहत्यानं लिहिलं आहे की, ‘मला तुम्हा दोघांचं बाँडिग खूप आवडलं आहे… ‘ असं म्हणत त्यानं कार्तिक आणि क्रितीला टॅग केलं आहे. इतकंच नाही तर त्यानं या पोस्टमध्ये #kariti हा हॅशटॅगही वापरला आहे.

Video: लग्नसोहळ्यात आज्जीबाईंबरोबर बेफाम नाचला रणवीर सिंह

रोहित धवन दिग्दर्शन करत असलेल्या ‘शहजादा’ सिनेमात या दोघांव्यतिरीक्त मनीषा कोइराला, परेश रावल, रोनित रॉय, सचिन खेडेकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा ४ नोव्हेंबर २०२२ मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here