मुंबई- सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ सिनेमात त्सुनामी सिंगच्या भूमिकेने चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या ला तडकाफडकी इस्पितळात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या उजव्या पायाची व्हेरिकोज व्हेन फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. रजत शेवटचा वरुण धवन आणि सारा अली खान यांच्या ‘कुली नंबर १’ सिनेमात दिसला होता. गेल्या आठवड्यात त्याला इस्पितळात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत रवैल म्हणाला की, ‘सध्या रक्तस्त्राव होणं बंद झालं आहे आणि माझ्या जखमाही भरून येत आहेत.’
आता त्याला बरं वाटत असल्याचंही रजत म्हणाला. उपचाराबाबत बोलताना तो म्हणाला की, ‘मला पूर्ण विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या कोणलाही मला भेटण्याची परवानगी नाही. मी उद्या दुसऱ्या सल्ल्यासाठी माझ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेचा रिपोर्ट सिनिअर व्हॅस्कुलर सर्जन डॉ. पंकज पटेल यांना दाखवणार आहे. जेणेकरून मला त्याच्या आधारावर पुढील उपचार करता येतील.’
रजत रवैल ने लोकांना त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच त्यांनी चाहत्यांचेही आभार मानले. वृत्तानुसार, रवैलला सोमवारीच इस्पितळातून डिस्चार्ज मिळणार आहे.