अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांचं आगीवर नियंत्रण
बुधवारी सकाळी ही घटना घडली तेव्हा दुकान बंद होते. दुकानातून आगीचे लोट बाहेर येत असल्याचे दिसल्यावर आग लागल्याचे लक्षात आले. स्थानिक नागरिकांनी दुकानाकडे धाव घेतली. त्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन दलाला कळविण्यात आले. अग्निशामक दलाचे कर्मचारी चालक अशोक काळे, शिवाजी कदम, राजू कांडेकर आणि स्थानिक रहिवाशी भरत पडगे यांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी परिश्रम घेतले.
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज
आगीमुळे दुकानाचे शटर अडकले होते. त्यामुळे ते उघडत नव्हते. शेवटी ते शटर तोडावे लागले. यात बराच वेळ गेला. या कालावधीत आग दुकानाच्या आतून मोठ्या प्रमाणात पसरली. शटर तोडल्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी दुकानात प्रवेश करत आगीवर पाणी मारले. दुकानाचे मालक गणेश रच्चा यांनी सांगितले की, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. सुरुवातीला खालच्या मजल्यावर आग लागली. त्यानंतर आग दुसर्या मजल्यापर्यंत पोहचली. दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावर आम्ही सगळे राहतो. घरामध्ये आठ व्यक्ती होत्या. धूर तिसरा मजल्यापर्यंत पोहोचला होता. आम्ही घरातील सर्व सुखरूप आहोत. आगीमुळे दुकानातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.