मुंबई : बॉलिवूडमध्ये फॅशन, स्टाइल यांचा एक हटके ब्रँड असलेली अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिने दिलेल्या गुडन्यूजमुळे चर्चेत आहे. लवकरच आई होणार असल्याचं सोनम आणि तिचा पती आनंद आहुजा यांनी गेल्याच महिन्यात सोशल मीडियावर शेअर केलं होतं. गरोदरपणात पती आनंदसोबतचे घरातील क्षणही ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

सोनम कपूर

एकीकडे तिचे बेबी बंपसोबत फोटोसेशनही सुरू आहे आणि गरोदरपणातील काळजी घेणंही ती करत आहे. येत्या ऑगस्टमध्ये सोनमच्या घरी चिमुकला पाहुणा येणार आहे. पण आई होणार या आनंदाबरोबरच या काळात होणारा शारीरिक त्रास, मानसिक अवस्थेतील बदल याचाही अनुभव ती घेतेय. पण पहिल्या तीन महिन्यातील त्रासाने सोनमला हैराण केलं आहे. एका मुलाखतीत सोनमने तिचा गरोदरपणातील अनुभव शेअर करताना अती झोप, बेचैनी सोसवेना झाल्याचं सांगितलं.


काही मोजक्या सिनेमात काम केल्यानंतर सोनमने लंडनस्थित उदयोगपती आनंद आहुजा याच्यासोबत २०१८ ला लग्न केलं. लग्नानंतर सोनम तिच्या लंडनच्या घरी गेली. काही इव्हेंटसाठी तिचं भारतात येणं व्हायचं. ती प्रेग्नन्सीमुळे लंडनहून दिल्लीला आली. लवकरच ती मुंबईला येणार आहे. सध्या दिल्ली येथे पती तिची गरोदरपणात काळजी घेत आहे. नुकतेच तिने काळ्या रंगाच्या कफ्तान ड्रेसमध्ये केलेल फोटो शूट सोशल मीडियावर व्हायरल झालं. या फोटोंमध्ये तिच्या ड्रेसपेक्षा तिच्या चेहऱ्यावरील प्रेग्नन्सीचं तेज पाहूनच चाहत्यांनी तिच्यावर कमेंटचा वर्षाव केला.

काजल अग्रवाल झाली आई! घरी आला चिमुकला पाहुणा!

घरी सुध्दा ती आरामदायी कपडे वापरत असल्याचं तिने सांगितलं. पती आनंदसोबत एक खास फोटो शेअर करत तिने, तुझ्या संगोपनासाठी चार हात तयार आहेत. तुझ्या स्वागतासाठी आम्ही खूप बेचैन आहोत, आता जास्त वाट पाहू शकत नाही अशी कॅप्शन लिहून बाळासाठी असलेली आतुरता दाखवून दिली आहे.


एकीकडे हा आनंद सुरू आहे पण सोनमला होत असलेल्या गरोदरपणातील त्रासाने ती हैराण झाली आहे. सोनमने एका मुलाखतीत सांगितलं की खरं तर ती सकाळी लवकर उठणारी मुलगी आहे. पण गेल्या तीन महिन्यात तिची झोपच पूर्ण होत नाही. अनेकदा झोपेतून जाग न आल्यामुळे तिच्या नियोजित असलेल्या ऑनलाइन मीटिंगलाही तिला उपस्थित राहता आलं नाही. अती झोपेबरोबरच सोनमला बेचैनीचा त्रासही वाढला आहे. यामध्ये तिला श्वास घेण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतं. या त्रासामुळे सोनमच्या हातात असलेल्या काही व्यावसायिक कामांकडे लक्ष देणंही तिला कठीण जात आहे.

कार्तिक आर्यन आणि क्रिती सैनन पडले प्रेमात? रस्त्यावर मौजमजा करताना दिसलं कपल

बॉलिवूडमधल्या स्टारकिडपैकी एक म्हणून जरी सोनम कपूरची सिनेमात एन्ट्री झाली असली तरी सोनमच्या सिनेमाची निवड आणि तिचा अभिनय यामुळे तिने तिचा चाहतावर्ग निर्माण केला. सावरियाँ या सिनेमातून तिचं पदार्पण झालं. नीरजा, द झोया फॅक्टर, वीरे दी वेडिंग, रांजणा, मिल्खा सिंग यासारख्या सिनेमातील सोनमच्या भूमिका खूप गाजल्या. २०२० ला एके विरूध्द एके या सिनेमात ती दिसली होती. तर क्राइम थ्रिलर असलेला ब्लाइंड हा तिचा आगामी सिनेमा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here