नागपूर: यवतमाळ जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात आठ जणांना करोना विषाणूचा संसर्ग झाल्याच्या धक्क्यातून सावरत नाही, तोच विदर्भाला गुरुवारी आणखी एक धक्का बसला. यवतमाळपाठोपाठ आता येथील सात जण, तर येथील आणखी पाच जणांना करोनाची लागण झाल्याचं चाचणी अहवालातून स्पष्ट झालं. त्यामुळे करोनाची लागण झालेल्या विदर्भातील रुग्णांची संख्या आता ५० वरून ६२ वर गेली आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील रुग्णांपैकी एक जण ५७ वर्षीय, तर दुसरा ३३ वर्षीय तरुण आहे. बुलडाण्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या आता १७वर पोहोचली आहे. बुलडाण्यातील शेगांवमध्ये दोन, खामगाव, देऊळगाव राजा आणि मलकापूर येथे प्रत्येकी एक अशा पाच नव्या रुग्णांची नोंद आज दिवसभरात झाली आहे. अकोला जिल्ह्यात एकाच दिवशी इतके रुग्ण करोनाच्या निदान चाचणीत दोषी आढळल्याने विदर्भाच्या जीवाला लागलेला घोर वाढत आहे. त्यामुळे विदर्भ गुणाकार पद्धतीने वाढणाऱ्या करोनाच्या समुह प्रादुर्भावातून वाटचाल करीत असल्याची शक्यता बळावली आहे.

विदर्भातील सद्यस्थिती:

बुलडाणा – १७, वाशिम- १, अकोला- ९, नागपूर – १९, यवतमाळ – ११, गोंदिया – १, अमरावती – ४

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here