मुंबई : आलिया भट्ट हिचा तिच्या लग्नामध्ये जो लूक होता त्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होती. आलियाचा मेकअप, मेंदी, तिची हेअर स्टाइल, तिची साडी यामुळे तिनं नववधूचा एक नवीन ट्रेंड सेट केला आहे. लग्नासोहळ्यामध्ये आलिया अतिशय गोड दिसत होती. हाताला थोडीशी मेंदी, मोकळे केस, लाईट मेकअप, आयवरी रंगाची साडी… आलियाच्या चेहऱ्यावर नववधूचं तेज होतं. आता आलियाच्या लग्नासंदर्भातील एका वेगळ्याच गोष्टीची चर्चा आता होऊ लागली आहे.

आलिया भट्ट

आलिया भट्टनं तिच्या लग्नामध्ये जुनीच सँडल वापरली होती. लग्नसोहळ्यानंतर जेव्हा आलिया आणि रणबीर बाहेर आले होते. त्यांनी फोटोग्राफर्सना पोझ दिल्या. त्यानंतर हे दोघं आतमध्ये गेले. आतमध्ये जाताना रणबीरनं आलियाला कडेवर उचललं. त्यावेळी आलियाची हिलची सँडल देखील फोटोमध्ये दिसली. हीच सँडल आलियानं तिच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाच्या प्रमोशवेळी वापरली होती.

कधी अती झोप तर कधी बेचैनी, सोनम कपूरला गरोदरपणाचा त्रास सोसवेना

आलिया भट्ट रणबीर कपूर

याशिवाय Diet Sabya या सोशल हँडलवर आलियाच्या साडीच्या पदराचा फोटो शेअर करण्यात आला आहे. साडीच्या पदरावर आलिया आणि रणबीरच्या लग्नाची तारीख लिहिलेली दिसत आहे. ही तारीख सिल्व्हर वर्कमध्ये लिहिण्यात आली आहे.

Jayeshbhai Jordaar : लिंग समानतेवर भाष्य करतो रणवीर सिंग

आलियाच्या साडीचा पदर

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे एकमेकांबरोबर पाच वर्ष रिलेशनमध्ये होते. या दोघांनी १४ एप्रिल रोजी लग्न केलं. रणबीरच्या ‘वास्तू’ येथील घरी हा विवाहसोहळा थाटामाटात झाला. लग्नसोहळ्याला दोघांच्या कुटुंबातील जवळचे सदस्य आणि जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते. लग्न झाल्यानंतर हे दोघंजण आपापल्या कामात बिझी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here