अहमदनगर : इंधनाचे दर वाढल्याने आणि पुन्हा रोखीचे व्यवहार वाढल्याने पेट्रोल पंपावर संकलित होणाऱ्या रोख रकमेत वाढ झाली आहे. अशीच रोकड पाहून अनेक वर्षांपासून पेट्रोल पंपावर व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्याची नियत फिरली. तो सुमारे १० लाख ३७ हजार रुपयांची रोकड घेऊन पळून गेला. मालकाने शोधाशोध करूनही तो सापडला नसल्याने अखेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नगर शहरात झोपडी कॅन्टीन परिसरातील दीपक पेट्रोल पंपावर ही घटना घडली. पंपावरील व्यवस्थापक अ‍ॅगस्टीन जॉर्ज गोन्सालविस (वय ५५ रा. ख्रिश्चन कॉलनी, तारकपूर) हा १० लाख ३७ हजार ३८४ रुपये घेऊन पळून गेला. पंपाचे मालक अनिल भोलानाथ जोशी (वय ५५ रा. मेघराज कॉलनी, सहकारनगर, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

‘बाधित’ दिल्लीची आज लढत; RT-PCR चाचणी निर्णायक
अनेक दिवसांपासून व्यवस्थापक म्हणून काम करीत होता…

ऑगस्टीन जॉर्ज गोन्सालविस हा जोशी यांच्या पेट्रोल पंपावर गेल्या अनेक दिवसांपासून व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. दिवसभरात पेट्रोल पंपावर संकलित होणारी रक्कम बँकेत जमा करण्याचे कामही तो अनेक वर्षांपासून करीत होता. त्यामुळे त्याच्यावर मालकाने संशय घेण्याचे कारण नव्हते. पंपावरील इतर व्यवहारही तोच पाहात असे.

काल पंपावर दोन दिवसांचे मिळून ९ लाख ९७ हजार रुपये जमा झाले होते. शिवाय कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीची ४० हजार रुपयांची रक्कमही त्याच्याकडे होती. ही रक्कम बँकेत भरायला जातो, असे सांगून व्यवस्थापक फरार झाला आहे.

पुण्यात मोठी कारवाई; वसुली करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here