धुळे : कॉम्प्युटर इंजिनिअर असलेल्या सुनेवर निवृत्त प्राचार्य सासऱ्याने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार अमरावती येथे घडला आहे. मात्र, पिडीता धुळ्याची असल्याकारणामुळे देवपूर पोलिसांनी सासर्‍यासह पीडितेच्या पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

वारंवार होत होता छळ…

अमरावती येथील एका महाविद्यालयातून सेवानिवृत्त प्राचार्यांच्या कॉम्प्युटर इंजिनिअर असलेल्या २६ वर्षीय मुलाचा धुळे येथील तरुणीसोबत २४ डिसेंबर २०२० रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर संबंधित पीडिता अमरावती येथे गेली. मात्र, काही महिन्यानंतरच सासऱ्याने सुनेला ब्लॅकमेल करून तिचा छळ केला. सासऱ्याने सुनेवर खोटे आरोप करून मुलाला घटस्फोट देण्यास भाग पाडण्याची धमकी देखील दिली. तसेच सुनेकडून पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी ४० लाख रुपयांची मागणी करत सुनेच्या माहेरी सासरच्यांनी हजेरी लावली. तसेच तिच्या चारित्र्यावर आरोप करत विवाहितेवर वारंवार अत्याचार केला.

raj thackeray rally : राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी मिळणार का? आता राष्ट्रवादीने केली मोठी मागणी
पुणे येथून पोलिसांनी घेतलं ताब्यात…

पीडितेने सासरा बलात्कार करत असल्याचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. हा व्हिडीओ विवाहितेने सासू आणि पतीला दाखवल्यानंतरही त्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. करोना कालावधीत निरंतर अत्याचार सहन केल्यानंतर कोरोनाचे निर्बंध हटविले गेल्यानंतर विवाहितेने तिच्या मामाला घडलेला हा प्रकार सांगितला. यानंतर मामाच्या मदतीने वडिलांकडून विवाहितेने धुळ्यातील देवपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सासऱ्यासह सासू आणि पती या तिघांना पुणे येथून ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश नाईक यांना कोणत्याही क्षणी अटक; शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here