
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये लगीनघाई सुरू आहे. कतरिना कैफ आणि विकी कौशल, फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर, वरूण धवन आणि नताशा, राजकुमार राव आणि चित्रलेखा अशा खास जोड्यांनी लग्न करून संसार थाटला. तर नुकतंच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचंही लग्न झालं. आता बॉलिवूडमध्ये पुन्हा एका स्टारकिड असलेल्या आथिया शेट्टी हिचे सनई चौघडे वाजणार आहेत.
काय सांगता! Alia Bhatt नं लग्नात घातल्या जुन्याच सँडल्स; साडीच्या पदरावर लग्नाबाबतचा खास संदेश
अथिया आणि के. एल. राहुल हे २०१९ पासून एकमेकांना डेट करत आहेत. अथियाची मैत्रीण अनुष्का रंजन हीने या दोघांसोबतचा थायलंड व्हेकेशनचा फोटो तीन वर्षापूर्वी शेअर केला, तेव्हापासूनच अथिया आणि राहुल यांच्या रिलेशनशिपची चर्चा आहे. अर्थात अनेक लाँक व्हेकेशन्सला ही जोडी नेहमीच एकत्र जाते आणि बिनधास्तपणे फोटोही शेअर करते. एकमेकांच्या वाढदिवसाला ते खास भेटही देत असतात. त्यामुळे या दोघांनी कधीच त्यांचं नातं लपवलं नव्हतं.
इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप दौऱ्यात आथिया के. एल. राहुलसोबत होती. या दौऱ्यात जेव्हा प्रत्येक खेळाडूला विचारलं गेलं की त्यांच्यासोबत कोण पार्टनर आले आहे, तेव्हा के. एल. राहुल याने अथियाचं नाव घेतलं होतं. इतकंच नव्हे तर टी टवेंटी विश्वकप सामन्यावेळीही अथियाने राहुलची साथ दिली.
के. एल. राहुल आणि अथियाच्या नात्याला त्या दोघांच्या कुटुंबियांचाही सपोर्ट आहे. अथिया ही अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी आहे हे तर सर्वांना माहीत आहेच पण अथियाने अभिनय आणि मॉडेलिंगमधून तिची ओळख बनवली आहे. अथियाने २०१५ ला हिरो या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असून या सिनेमात ती आदित्य पंचोलीचा मुलगा सूरज पंचोली याची नायिका होती. त्यानंतर २०१७ ला मुबारकाँ या सिनेमात तिने अभिनय केला. २०१९ मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत मोतीचूर चकनाचूर या सिनेमात तिने स्क्रिन शेअर केली.
के. एल. राहुल भारतीय क्रिकेटर असून टी टवेंटी, आयपीएल यासह अनेक तो सामने खेळला आहे. कर्नाटकाकडून खेळण्याबरोबरच त्याने आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन्स पंजाब संघातही सहभाग घेतला आहे. पदार्पणातच पहिल्याच सामन्यात शतक करणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. फलंदाजीसोबत तो उत्कृष्ट विकेटकीपरही आहे.
कधी अती झोप तर कधी बेचैनी, सोनम कपूरला गरोदरपणाचा त्रास सोसवेना
अथिया आणि राहुल हे दोघेही साउथ इंडियन कुटुंबातील असल्याने या दोघांचंही लग्न साउथ इंडियन रितीनुसारच होणार आहे. खरं तर दोघांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे, मात्र अजून लग्नाची तारीख जाहीर न केल्याने त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.