लंडन : ब्रिटनचे (Britain) पंतप्रधान बोरिस जॉनसन (Boris Johnson) यांनी लॉकडाऊन काळातील पार्टीगेट (Partygate) प्रकरणी अडचणीत आले होते. जॉनसन यांना विरोधकांनी पार्टीगेटवरुन घेरलं होतं. आता बोरिस जॉनसन यांनी संसदेची माफी मागितली आहे. जॉनसन यांनी संसंदेत माफी मागताना जाणीवपूर्वक नियम मोडले नसल्याचं म्हटलं आहे. मी संसदेची दिशाभूल देखील केलेली नाही, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. जॉनसन यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये संसद सदस्यांना यासंदर्भातील माहिती दिली आहे. जन्मदिवसाच्या दिवशी केक कापण्यात आला ती सभा नव्हती असं त्यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेतील कंपनीला कर्मचाऱ्याला वाढदिवसाची पार्टी देणं भोवलं, ४.५ लाख डॉलर्सची भरपाई देण्याची वेळजॉनसन यांना एका पार्टी प्रकरणी एकदा दंड ठोठावण्यात आला आहे. ही पार्टी जून २०२० मध्ये आयोजित करण्यात आली होती .१० डाऊनिंग स्ट्रीटमध्ये बोरिस जॉनसन यांना पार्टीत भाग घेतल्यानं ६६ अमेरिकन डॉलर्सचा दंड करण्यात आला होता. पदावर असताना कायदा मोडणारे बोरिस जॉनसन हे पहिले पंतप्रधान बले आहेत. ब्रिटीश माध्यमांच्या माहितीनुसार पोलीस लॉकडाऊन काळातील १२ पार्टी प्रकरणी तपास करत आहे. यामधील सहा प्रकरण बोरिस जॉनसन यांच्याशी संबंधित आहेत.

बोरिस जॉनसन यांनी संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बोलताना आपली चूक मान्य केली आहे.नियम मोडल्यामुळं नागरिकांचा रोष मान्य असल्याचं जॉनसन म्हणाले आहेत. पहिल्यापासून पार्टीगेट प्रकरणावरुन राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षांनी जॉनसन यांच्यावर हल्लाबोल केला होता.

मजूर पक्षाच्या वतीनं पार्टीगेट प्रकरणावरुन बोरिस जॉनसन यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. हाऊस ऑफ कॉमन्सच्या अध्यक्ष लिंडसे हॉयल यांनी मजूर पार्टीला सामान्य चर्चेला परवानगी दिली. याशिवाय संसदेची दिशाभूल केल्याप्रकरणी बोरिस जॉनसन यांची चौकशी सभागृहात होईल, असं म्हटलं. बोरिस जॉनसन यांच्यावरील आरोपांवर गुरुवारी संसदेत मतदान पार पडणार आहे. विरोधी पक्षांकडून बोरिस जॉनसन यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर बोरिस जॉनसन यांना पंतप्रधानपदावरुन हटवण्यात येऊ नये, असं सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी म्हटलं आहे.
चीननं सुरक्षा कराराद्वारे आणखी एक मित्र जोडला, अमेरिकेसह ऑस्ट्रेलियाची चिंता वाढणार
मजूर पक्षाच्या नेत्या रेनर यांनी जॉनसन यांच्यावर हल्लाबोल केला होता. बोरिस जॉनसन यांच्याकडून नागरिकांची फसवणूक करण्यात येत आहे.कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात ब्रिटनची जनता बलिदान देत असताना बोरिस जॉनसन कायदा तोडत होते, असा आरोप रेनर यांनी केला.

बोरिस जॉनसन नुकतेच यूक्रेनमधील कीव शहरात राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांना भेटून परत आलेले आहेत. पार्टीगेट प्रकरणी बोरिस जॉनसन यांना आणखी दंड भरावा लागू शकतो.
बोरिस जॉनसन २१ एप्रिलपासून भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. भारत भेटीमध्ये ते गुजरातला जाणार आहेत. गुजरातमधील अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी आणि बोरिस जॉनसन यूक्रेन रशिया युद्धासह इतर विषयांवर चर्चा करतील, अशी माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here