मुंबई: देवमाणूस मालिकेच्या पहिल्या सीझननं टीआरपीचे अनेक रेकॉर्ड्स मोडले. पहिला सीझन संपल्यानंतर मालिकेत काही वेगळं पाहायला मिळणार का? याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. प्रेक्षकांचा हिरमोड झाल्याच्या प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर उमटत होत्या. पण आता पुन्हा एकदा मालिता रंजक वळणावर आली आहे.
डिंपल अडकली डॉक्टरच्या जाळ्यात, लग्नाचं गिफ्ट पाहून सरकली पाया खालची जमीन
‘देवमाणूस’च्या पहिल्या पर्वात अजितकुमारनं अनेक महिलांना त्याच्या जाळ्यात ओढत त्यांचा खून केला होता. या खूनांचा तपास करत असलेल्या दिव्या सिंगनं अजित आणि डिंपलला त्यांच्या लग्नाच्या मांडवातून खेचून पोलिस स्टेशनला नेल्यामुळं डिंपल आणि अजितचं लग्न काही होऊ शकलं नव्हतं. पण आता या पर्वातही या दोघांच्या लग्नाचा घाट घालण्यात आला होता. दोघांचं लग्न होणार की नाही,याबद्दल चर्चा सुरू होती.अखेर दोघांचं लग्न पार पडलं आहे. पण या सगळ्यात अजितकुमारनं सोनाली म्हणजेच सोनूचा खून केला आहे.


डॉक्टर आणि डिंपलनं सोनूचा मृतदेह गावातील नदीत टाकला. सोनूचा मृतदेह मिळाल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर मृतदेह पाहून सोनूची आई म्हणजे मधू मॅडम यांना जबर धक्का बसतो. लेकीच्या मृत्यूचा धक्क्यानं मधू गावात सैरावैरा पळत मुलीचा शोध घेतात. त्यांना वेड लागतं. मधू यांच्या अवस्थेवर निर्दयीपणे हसतो. त्यामुळं मालिकेत पुढं काय होणार याबद्दल सोशल मीडियावर चर्चा होत आहेत.

देवमाणूस २‘ या मालिकेनं नुकताच १०० भागांचा टप्पा गाठला आहे. मालिकेच्या सेटवर केक कापत हा आनंद संपूर्ण टीमनं साजरा केला. या यशामागं संपूर्ण टीमची मेहनत असल्यामुळं या आनंदाच्या क्षणी एकमेकांचं कौतुक करण्यासह आभारदेखील मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here