इब्राहिमसोबतच्या नात्याबद्दल पलकनं सोडलं मौन, म्हणाली…
कॅन्सरवर मात करत सध्या बॉक्स ऑफिसवर कल्ला करत असलेल्या केजीएफ चॅप्टर टू या सिनेमात अधिरा हा क्रूर खलनायक संजय दत्तने रंगवला आहे. या सिनेमाच्या पहिल्या भागात केवळ अधिराची सावली दाखवण्यात आली होती. त्यामुळे गरूडाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हिरो रॉकीसमोर उभा राहणारा अधिरा कसा असेल याकडे केजीएफ चॅप्टर १ प्रेमी प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं होतं. केसांची पोनी, लेदर जॅकेट, डोळ्यात आग आणि चेहऱ्यावर क्रूरतेचे भाव असा अस्सल व्हिलन साकारून संजय दत्तने साउथ सिनेमात पाय रोवले. केजीएफ चॅप्टर टू सिनेमाचा महत्त्वाचा भाग होत असताना संजय दत्तने दाक्षिणात्य सिनेमाची का चलती आहे, याचं सिक्रेट सांगितल्याने सध्या तरी त्याच्याकडे नजरा वळल्या आहेत.

एका मुलाखतीत संजय दत्तला, केजीएफ चॅप्टर टू हा सिनेमा कसा मिळाला यावर प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा केजीएफ सिनेमाची टीम दुसऱ्या भागासाठी अधिराचा शोध घेत होती. या सिनेमात रॉकीचा दबदबा आहेच पण त्यावर भारी पडणारा अधिरा टीमला हवा होता. त्या टीमपैकी एक व्यक्ती संजय दत्तची पत्नी मान्यताचा मित्र आहे. त्याच्याकडून संजय दत्तपर्यंत अधिराची ऑफर आली. हा किस्सा सांगताना संजय दत्त म्हणाला, मला अधिरा करण्याबाबत ऑफर आली तेव्हा मी केजीएफ पार्ट वन पाहिलाच नव्ह्ता. त्यामुळे गरूडा किंवा अधिराचं वर्णन मला माहीत नव्हतं. ऑफर नाकारण्याचा प्रश्नच नव्हता, पण त्याआधी मी आणि मान्यता आम्ही दोघांनी केजीएफ चॅप्टर वन सिनेमा बघितला आणि मगच अधिरा करण्यासाठी होकार दिला.
या मुलाखतीत प्रश्नांची गाडी जेव्हा दाक्षिणात्य सिनेमे देशभरातच नव्हे तर जगभरात का चालतात. याचं नेमकं कारण काय, या मुद्द्यावर आली तेव्हा संजय दत्त याने दिलेलं उत्तर खूपच रंजक आहे. संजय दत्त म्हणाला की साउथचे सिनेमे हे त्यातील हिरोला महत्त्व देतात. त्यांनी हिरोच्या साहसाला बगल दिलेली नाही. याउलट बॉलिवूडमध्ये याच गोष्टीचा विसर पडत चालला आहे. तसंच दाक्षिणात्य सिनेक्षेत्रातील निर्माते हे दिग्दर्शकांना स्वतंत्रपणे काम करण्यास प्रोत्साहन देतात. बॉलिवूडमध्ये अजूनही निर्मात्यांचा वरचष्मा आहे ज्यामुळे दिग्दर्शकाला त्याच्या मनाप्रमाणे काम करता येत नाही.
Photo : विकी कौशलचे अॅब्ज पाहून चाहते झाले सैराट; म्हणाले,’फायर है भाई!’
खरं तर पूर्वी निर्माते फक्त गुंतवणूक करायचे आणि दिग्दर्शकाच्याच नजरेतून सिनेमा घडायचा. आता हेच बॉलिवूडमध्ये होत नाही. त्यामुळे हिंदी सिनेमाला दाक्षिणात्य सिनेमांच्या तुलनेत यशासाठी झगडावं लागतं. साउथचा सिनेमा हा निर्मात्याचा नव्हे तर दिग्दर्शकाचा असतो आणि हेच यशाचं रहस्य आहे. साउथला स्क्रिप्टच्या कागदावर सिनेमाच पाहिला जातो पण बॉलिवूडमध्ये स्क्रिप्टच्या कागदावरच कमाईची आकडेमोड केली जाते, हेदेखील बॉलिवूडमधील अयशस्वी सिनेमाचं कारण आहे.