मुंबई- गेल्या काही दिवसांपासून शेजारील देश पाकिस्तानमध्ये बरीच राजकीय उलथापालथ सुरू आहे. नवाझ शरीफ यांचे भाऊ शाहबाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान झाले आहेत. यानंतर पाकिस्तानच्या संसदेत मंत्री चौधरी जमील यांचा एक व्हिडिओ इण्टरनेटवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मंत्री अत्यंत खाणेरड्या पद्धतीने पोट खाजवताना दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पाकिस्तानी वंशाची अभिनेत्री आणि मॉडेल मथिरा मोहम्मद ने मंत्र्याला उपहासात्मक सल्ला दिला.


व्हिडिओमध्ये काय आहे?

खरं तर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पाकिस्तानी संसदेत सुरू असलेल्या बैठकीचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये मंत्री चौधरी जमील जवळजवळ खुर्चीवरच आडवे पडलेले दिसत आहेत आणि कुर्ता वर करून अतिशय वाईट पद्धतीने पोट खाजवताना दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओवर लोक खूप मजा घेत आहेत. दरम्यान, झिम्बाब्वे इथे जन्मलेली पाकिस्तानी वंशाची अभिनेत्री मथिराने तिची प्रतिक्रिया दिली आहे.

मथिरा

कोण आहे मथिरा?

मथिरा मोहम्मद ही झिम्बाब्वेमध्ये जन्मलेली पाकिस्तानी वंशाची मॉडेल, अभिनेत्री आहे. मथिरा तिच्या ‘मैं हूं शाहिद आफ्रिदी’ या आयटम साँगने प्रसिद्ध झाली. मथिराने ‘यंग मलंग’ या भारतीय पंजाबी सिनेमात आयटम साँगही केले आहे. मथिराची बहीण रोज मोहम्मददेखील अभिनेत्री आहे. मथिराने २०१२ मध्ये पाकिस्तानी पंजाबी गायक फरहान मिर्झाशी लग्न केलं. दोघांना एक मुलगा आहे. मथिरा आणि फरहान २०१८ मध्ये वेगळे झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here