सुरेश कोलगेकर, सिंधुदुर्ग: चिपी विमानतळावरून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसमोर आता एक अडचण उभी राहिली आहे. कारण, या मार्गावरील प्रवास करण्यासाठी आता एअर इंडियाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन बुकिंग करता येणार नाही. एअर इंडियाकडून (Air India) ही सेवा बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी चिपी विमानतळासाठी सेवा देणाऱ्या ‘अलायन्स एअर’ या कंपनीच्या संकेतस्थळावरुन तिकीट बुकिंग सेवा सुरु झाल्याची माहिती अलायन्स एअरचे अधिकारी समीर कुलकर्णी यांनी दिली. तसेच चिपी-मुंबई विमानाच्या वेळापत्रकातही बदल झाला आहे.
Ratnagiri airport: चिपीनंतर आता रत्नागिरीत विमानतळ सुरू करण्याच्या हालचाली, केंद्र सरकारकडे…
चिपी विमानतळ सुरु झाल्यामुळे मुंबई-सिंधुदुर्ग हा प्रवास सोपा झाला होता. आतापर्यंत त्यासाठी एअर इंडियाच्या साईटवर जाऊन तिकीट बुकिंगची सोय होती. पण १५ एप्रिलपासून एअर इंडिया ही टाटा कंपनीने घेतल्याने एअर इंडियाने आपल्या साईटवरून सिंधुदुर्ग चिपी बुकिंग बंद करण्याचा निर्णय घेतला. मुंबई ते चिपी आणि परत या मार्गासाठी एअर इंडियाची संलग्न कंपनी अलायन्स एअर ही सेवा देते. पण आता एअर इंडिया टाटाने घेतल्याने या दोन कंपन्या वेगळ्या झाल्या आहेत. त्यामुळे अलायन्स एअर या कंपनीच्या साईटवरून सिंधुदुर्ग-मुंबई विमान प्रवासाचं तिकीट बुकिंग सुरु करण्यात आले आहे. सध्या विमान प्रवासाकरिता www.allianceair.in अशी ही वेबसाईट असून यावर तिकीट बुकिंग होतं, अशी माहिती समीर कुलकर्णी यांनी दिली.

‘चिपीसाठी शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला’
त्याचसोबत उडान योजनेअंतर्गत विमानातील ३५ जागा राखीव असून त्यासाठी २४२५ रुपये तिकीट आहे. पण त्यानंतरचा तिकीट दर कंपनीच्या दराप्रमाणे उपलब्ध आहे.विमानाच्या वेळापत्रकातही ही बदल झाले आहेत. आठवड्यातून बुधवार, शुक्रवार आणि रविवार या तीन दिवशी सिंधुदुर्ग विमानतळावरून सकाळी ९.५५ वाजता विमान सुटेल. तर सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार या दिवसांसाठी दुपारी १.५० वा. विमान सुटेल.

6 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here