मुंबई :शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. संजय राऊत यांनी शिवसेनेचं (Shivsena) विदर्भातील (Vidarbha) पक्ष संघटन विस्तार आणि एसटी संप यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. नागपूर महापालिकेच्या दृष्टीनं पक्षाची बांधणी सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. विदर्भात जर पक्ष वाढवायचा असेल जर शिवसेना वाढवायची असेल तर नागपूरमध्ये घट्ट पाय रोवले पाहिजेत. उपराजधानी आहे, हिंदुत्त्वाचा गड आहे, एकेकाळी शिवसेनेची ताकद होती, आताही आहे. नागपूरला आदित्य ठाकरे शासकीय कामासाठी जाणार आहेत, ते पक्षासंदर्भात भूमिका घेतील, असं संजय राऊत म्हणाले.
दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात आजपासून मेघगर्जनेसह पाऊस?, मुंबईत ढगाळलेले वातावरण
शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष केंद्रीत करत आहोत. विदर्भात आम्ही लक्ष घालायला सुरुवात केली आहे. विधानसभेत निवडणुकीत ताकदीनं प्रतिनिधीत्त्व मिळवायचं असेल तर ६५ जागा असलेल्या विदर्भात लक्ष घालायला सुरुवात केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षकार्यासाठी लवकरच कामाला लागतील. मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीचा विषय होता, कोरोनाचं संकट होतं, मात्र आता आम्ही संघटनात्मक कामासाठी तयार आहोत, असं संजय राऊत म्हणाले.

विदर्भ महाराष्ट्राचा महत्त्वाचा भाग आहे. तिथून ६५ आमदार निवडून येतात. आमचे खासदार आणि आमदार विदर्भात आहेत. विदर्भ हिंदुत्त्वाचा गड राहिला आहे, तिथं आम्ही जाणार आहोत. उद्धव ठाकरे यांनी विदर्भावर अधिक लक्ष द्यावं लागेल, अशा सूचना दिल्या आहेत. येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि दिलीप वळसे पाटील अडचणीत?

पोलिसांच्या बदल्या हा सरकारचा गृह खात्याचा विषय आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी बोलणं टाळलं. सरकारनं आणि गृहखात्यानं कठोर कारवाई केल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपलेला आहे. कुठली तरी अज्ञात शक्ती कामगारांना भडकवून महाराष्ट्र आणि मुंबईत उद्रेक घडवायचा प्रयत्न करत होते. पण, त्यांना दुर्बुद्धी सुचल्यानं ते शरद पवारांच्या घरावर चालून गेले. सरकारनं कठोर कारवाई केल्यानं असामाजिक तत्त्वांना राजकीय शक्तींचा पाठिंबा होता. असामाजिक तत्त्व तुरुंगात गेल्यानं लालपरी रस्त्यावर धावू लागली, असं संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात ठिकठिकाणी राजकीय सभा होत असतात. प्रत्येक सभेवर भाष्य करता येणार नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या सभेवर बोलणं टाळलं आहे.आपल्या मर्जीतील उद्योगपतींना देश विकल्यावर कुणाच्या प्रॉपर्टी विकताय, देशाची संपत्ती विकून पोट भरलं नसेल. हा देश जवळजवळ विकला आहे, असं संजय राऊत म्हणाले. सार्वजनिक उद्योग, सार्वजनिक उपक्रम सर्व विकून टाकलं आहे. देश विकला त्याचे पैसे कुठं गेले, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here