मुंबई: गेल्या काही महिन्यांमध्ये महाविकास आघाडीत टीकेच्या केंद्रस्थानी असलेल्या राज्याच्या गृहखात्यामधील असमन्वय पुन्हा एकदा समोर आला आहे. गृहमंत्रालयाने बुधवारी रात्री राज्यातील ३७ अधिकाऱ्यांच्या बढत्या आणि बदल्यांचा आदेश काढला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी या आदेशाला स्थगिती देण्यात आल्याची चर्चा आहे. या सगळ्याविषयी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी यावर मौन बाळगणे पसंत केले.

संजय राऊत यांनी गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना गृहखात्याने पोलिसांच्या पदोन्नतीच्या आदेशाला अवघ्या काही तासांमध्ये स्थगिती देण्यात आल्याविषयी विचारणा करण्यात आली. सुरुवातीला कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांची पदोन्नती रोखली, असा सवाल राऊत यांनी केला. परंतु, असा आदेश निघाल्याचे प्रसारमाध्यांच्या प्रतिनिधींनी सांगितल्यानंतर संजय राऊत यांनी म्हटले की, हा गृहखात्याचा अंतर्गत विषय आहे. शासकीय विषय आहे. त्यावर मी बोलणार नाही.
Police transfers: काल आदेश काढला अन् आज स्थगिती; पोलीस पदोन्नतीच्या गृहमंत्रालयाच्या आदेशाला ब्रेक?
संजय राऊत यांनी यापूर्वीही गृहखात्याच्या मवाळ भूमिकेवर टीका केली होती. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर वेळीच कारवाई झाली असती तर शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला नसता. गुळमुळीत आणि बुळचट भूमिकेमुळेच ही वेळ ओढावली, असे सांगत संजय राऊत यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना कानपिचक्या दिल्या होत्या.

गृहमंत्रालयाने बुधवारी रात्री राज्यातील प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढतीचा आदेश जारी केला होता. मात्र,अवघ्या काही तासांमध्येच काही पोलीस अधिकाऱ्यांची पदोन्नती रोखण्यात आल्याचे समजते. गृहमंत्रालयाच्या यादीत नाव असणाऱ्या पाच पोलीस अधिकाऱ्यांची पदोन्नती रोखण्यात आली आहे. हे पोलीस अधिकारी मुंबई आणि ठाण्यातील असल्याचे समजते.
Sanjay Raut: इतके दिवस गुळमुळीत आणि बुळचट राहिल्यानेच शरद पवारांच्या घरावर हल्ला: संजय राऊत
शिवसेना नागपूरात लक्ष केंद्रित करणार: राऊत

शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष केंद्रीत करत आहोत. विदर्भात आम्ही लक्ष घालायला सुरुवात केली आहे. विदर्भात जर पक्ष वाढवायचा असेल जर शिवसेना वाढवायची असेल तर नागपूरमध्ये घट्ट पाय रोवले पाहिजेत. विधानसभेत निवडणुकीत ताकदीनं प्रतिनिधीत्त्व मिळवायचं असेल तर ६५ जागा असलेल्या विदर्भात लक्ष घालायला सुरुवात केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षकार्यासाठी लवकरच कामाला लागतील. मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीचा विषय होता, कोरोनाचं संकट होतं, मात्र आता आम्ही संघटनात्मक कामासाठी तयार आहोत, असं संजय राऊत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here