मी राजनैतिक व्यापार, संरक्षण आणि दोन्ही देशांच्या लोकांमधील संबंध वृद्धिंगत करण्यासाठी भारताचा दौरा करणार आहे,असं बोरिस जॉनसन म्हणाले आहेत. जो कार्बिस बे जी-७ संमलेनात भारत सहभागी असल्यानं हा दौरा करत आहे, असं जॉनसन म्हणाले. गेल्यावर्षी नरेंद्र मोदी यांनी करोना संसर्गाच्या कारणामुळं कार्बिस बे में जी ७ संमेलनाला ऑनलाईन संबोधित केलं होतं.
बोरिस जॉनसन यांनी मी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. ब्रिटनमध्ये गुंतवणूक करणाऱ्या उद्योगपतींची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
नरेंद्र मोदी आणि बोरिस जॉनसन यांच्यात रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धावर भारतानं घेतलेल्या तटस्थ भूमिकेबद्दल कोणतीही चर्चा होणार नाही, असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी हा दौरा रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धावर चर्चा करण्यासंदर्भात आयोजित करण्यात आला नसल्याचं सांगितलं आहे. हा दौरा बऱ्याच दिवसांपासून निश्चित करण्यात आला होता. भारत हा ब्रिटनचा महत्त्वाचा भागीदार असल्याचं ब्रिटीश अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
भारत आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध हा चर्चेतील एक विषय असू शकतो. रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध हा सध्याचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. युद्धामुळं अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा अस्थिर झाली असल्याचं ब्रिटीश अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.दिल्लीमध्ये पुढील आठवड्यात मुक्त व्यापार करारासंदर्भात तिसऱ्या फेरीची चर्चा सुरु होणार आहे.