police transfers | राज्यातील विशेष पोलीस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक आणि अधीक्षक दर्जाच्या ३७ अधिकाऱ्यांच्या बुधवारी बढत्या आणि बदल्या करण्यात आल्या होत्या. गृहखात्याने पोलिसांच्या पदोन्नतीच्या आदेशाला अवघ्या काही तासांमध्ये स्थगिती दिली.

हायलाइट्स:
- गृहमंत्रालयाने बुधवारी रात्री ३७ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढतीचा आदेश काढला होता
- अखेरच्या क्षणी पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती
गृहमंत्रालयाने बुधवारी रात्री ३७ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढतीचा आदेश काढला होता. यामध्ये मुंबई आणि ठाण्यातल्या पोलीस अधीक्षक आणि उपायुक्तांसह पाच जणांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती दिली गेली होती. मात्र, हा निर्णय घेताना विश्वासात न घेतले गेल्याने एकनाथ शिंदे प्रचंड नाराज झाले. याविषयी बोलण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी वळसे-पाटील यांनाही फोन केला होता. मात्र, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेरच्या क्षणी पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती दिली, असे सांगितले जाते.
नक्की काय घडलं?
गृहमंत्रालयाकडून बुधवारी रात्री बदल्यांचे जे आदेश काढण्यात आले त्यामध्ये मुंबई आणि ठाणे परिसरातील पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता. पोलीस अधिकारी महेश पाटील, राजेंद्र माने, संजय जाधव, पंजाबराव उगले, दत्तात्रय शिंदे या पोलीस अधिकाऱ्यांची मुंबई, मीरा-भाईंदर हद्दीत बदली करण्यात आली. एकनाथ शिंदे ठाण्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे या परिसरात पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यापूर्वी त्यांच्याशी चर्चा झाली पाहिजे होती. गृहमंत्रालयाने पालकमंत्र्यांशी चर्चा करून हा निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, गृहखात्याने परस्पर आदेश काढल्याने एकनाथ शिंदे नाराज झाल्याचे समजते. यावरून महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांमध्ये अंतर्गत संघर्ष असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : dilip walse patil give stay to police transfers due to shivsena eknath shinde
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network