पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच पुणेकरांची आजची सकाळ एका अत्यंत धक्कादायक बातमीने झाली. सैन्यदलात निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याने पत्नीवर गोळी झाडून स्वतःही आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बी टी कवडे रस्ता येथील सीताडेल सोसायटीत ही घटना घडली. निवृत्त कर्नल नारायण सिंह बोरा (वय ७४) आणि पत्नी चंपा बोरा (वय ६३) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावं आहेत. नैराश्यातून ही घटना घडली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. काल सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले असता दोघेही घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. पत्नी झोपलेली असताना नारायण सिंह बोरा यांनी तिच्या कपाळावर बंदुकीने गोळी झाडून त्यानंतर स्वतः आत्महत्या केली.

दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात आजपासून मेघगर्जनेसह पाऊस?, मुंबईत ढगाळलेले वातावरण
दुपारच्या सुमारास आई फोन उचलत नसल्यामुळे मुलीने सोसायटीतील सदस्यांना याची माहिती दिली. त्यानंतर सोसायटीतील सदस्यांनी घरी जाऊन पाहिले असता दरवाजा आतून लॉक होता. त्यामुळे पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी शेजारच्या घराच्या गॅलरीतून आत प्रवेश करत दरवाजा उघडला, तेव्हा दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here