मुंबई : बॉलिवूड अभिनेत्रींचं कुणाशी अफेअर आहे… त्यांचा ब्रेकअप कधी झाला… पॅचअप कसं झालं. मग अभिनेत्रीचं लग्नं कधी होणार, लग्न झालं की गुड न्यूज कधी देणार, आई झाल्याचं सांगितलं की बाळाचं नाव काय ठेवलं, बाळाचा फोटो का दाखवला नाही अशा एक ना हजार प्रश्नांनी सेलिब्रिटी कलाकारांना त्यांचे चाहते भंडावून सोडत असतात. त्यात हे सेलिब्रिटी कलाकार म्हणजे अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि हॉलिवूड स्टार निक जोनस असेल तर मग त्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्याची उत्सुकता तर काय विचारूच नका.

प्रियांका निक

तीन महिन्यांपूर्वी प्रियांकाने आई झाल्याची गोड बातमी दिली होतीच. पण आता प्रियांका आणि निक यांनी त्यांच्या लाडक्या लेकीचं नाव आणि तिची जन्मतारीख शेअर केली आहे. लेकीच्या नावात प्रियांका आणि निक या दोघांच्या नावाचा स्पर्श असल्याने हे नाव चाहत्यांनाही आवडलं आहे.

‘हे पद्मश्रीच्या लायकीचे आहेत का?’ अक्षय, शाहरुख,अजयच्या तंबाखू जाहिरातीवर आक्षेप

प्रियांका निक मालती मेरीसोबत

अमेरिकन गायक, गीतकार आणि अभिनेता निक जोनस याच्याशी बॉलिवूड अभिनेत्री आणि विश्वसुंदरी प्रियांका चोप्रा हिने २०१८ ला लग्न केलं. प्रियांका निकपेक्षा दहा वर्षांनी मोठी असल्याने त्यांच्या लग्नात वयातील अंतराची चर्चा रंगली होती. इतकंच नव्हे तर प्रियांका आणि निक यांच्यातील वयाच्या अंतरामुळे त्यांचं नातं टिकणार नाही अशीही टिका झाली होती. पण या जोडीने त्या सगळ्या अफवा खोट्या ठरवत दोनाचे तीन झाल्याचा आनंद साजरा केला. प्रियांकाने सरोगसी तंत्रज्ञानाच्या मदतीने या वर्षीच्या जानेवारी महिन्यात एका मुलीची आई झाल्याची बातमी दिली. त्यावेळीही तिच्यावर अनेक नेटकऱ्यांनी टिका केली पण तिने त्याकडे लक्ष देण्याऐवजी मुलीच्या जन्माच्या आनंदाकडे लक्ष दिले. आता प्रियांका आणि निक यांची लाडकी लेक तीन महिन्यांची झाल्यानंतर त्यांनी तिचं नाव ठेवलं आहे.

पैशांचा हव्यास नडला, अक्षय कुमारने चाहत्यांची मागितली माफी

प्रियांका निक बाळासोबत

प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी सांगितलं की मुलीचं नाव काय ठेवायचं यावर अनेक दिवस प्रियांका आणि निक यांचं एकमत होत नव्हतं. पण अखेर त्यांनी नाव निश्चित केलं. प्रियांका आणि निक यांनी सोशल मीडियावर लेकीचं नाव जाहीर केलं. मालती मेरी चोप्रा जोनस असं या चिमुकलीचं नाव आहे. मुलीच्या नावात आपल्या दोघांचीही नावं यावीत अशी प्रियांकाची इच्छा होती आणि तिच्या इच्छेचा मान निकनेही राखला. खरं तर २२ जानेवारीला प्रियांका आणि निक यांनी मुलगी झाल्याची बातमी दिली होती. पण मालती मैरीचा जन्म १५ जानेवारीला रात्री आठ वाजता झाल्याची नोंद तिच्या जन्मदाखल्यावर आहे. प्रियांकाने लेकीच्या जन्मानंतर तिचा पहिला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. आता मुलीचं नाव ऐकून चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here